हॅलो कृषी ऑनलाईन: आयुष्यभर उत्पन्नाचे वेगवेगळे स्त्रोत (Success Story) देणार्या पशुंना बरेचदा त्यांच्या भाकड काळात रस्त्यावर सोडले जाते. परंतु आज आपण अशा बहीण भावाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्यांनी भाकड गायींना (Bhakad Cow) आश्रय तर दिलाच शिवाय त्यांचे शेण आणि गोमुत्रापासून वेगवेगळ्या वस्तू (Things From Cow Dung And Cow Urine) तयार करून बचत गटांना सुद्धा रोजगार निर्माण करून दिला (Success Story).
सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) वडकबाळ येथील प्रा. उमा बिराजदार (Uma Birajdar) आणि रुद्रप्पा बिराजदार (Rudrappa Birajdar) या बहिण भावाने आध्यात्मिक प्रेरणेतून गोशाळा (Goshala) उभारली. या गोशाळेच्या माध्यमातून गेली पाच वर्ष ते भाकड गायींना आश्रय ते देत आहेत. या गायींना पाळतांना देशी खिल्लार गायीच्या (Khillar Cow) शेणापासून गोनाईन, वॉटर प्युरीफाईंग पावडरसारख्या उत्पादनासमवेत अंदाजे 30 वेगवेगळ्या उत्पादनांची निर्मिती (Success Story) सुद्धा ते करत आहेत.
पूर्वी ते फक्त गायीच्या शेणापासून सेंद्रिय खत तयार करत होते, परंतु उमेद या संस्थेच्या संपर्कात आल्यावर त्यांना गायीच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याची प्रेरणा मिळाली. या वस्तूंच्या निर्मितीसाठी विशेष म्हणजे या गोशाळेत त्यांनी बचत गटाच्या 250 ते 300 महिलांना रोजगारदेखील (Success Story) उपलब्ध करुन दिला आहे.
बिराजदार बहिण भावांनी स्वतःच्या शेतात गोसेवा सुरू केली आहे. त्यांच्या या कार्याला जैन समाज बांधवांनी सुद्धा मोठे पाठबळ दिले.
त्यांनी निर्माण केलेल्या वेगवेगळ्या उत्पादनामध्ये ‘गोनाईन’ हे थ्रीइन वन उत्पादन असून ते मच्छराचा नायनाट, फरशी पुसणे आणि रुम फ्रेशनर म्हणून काम करते.
तसेच त्यांनी तयार केलेल्या वॉटर प्युरिफायर पावडरने पाणी स्वच्छ होते. या उत्पादनांना चांगली मागणी आहे. महिला बचतगटाच्या महिलांना रोजगारही मिळत आहे.
गोशाळेत कोणकोणते उत्पादन तयार केले जातात
बिराजदार बहिण भावांच्या या गोशाळेत 12 प्रकारचे गोमूत्र अर्क, गोनाईन, गांडूळ खत, धूप, गोवऱ्या, विभूती, वॉटर प्युरिफायर, गोमूत्र, शेण आदी वस्तू बनवल्या जातात. विशेष म्हणजे या वस्तूंच्या विक्रीतून ते गोशाळेचा रोजचा खर्च काढू लागले आहेत.
गाईपासुन तयार केलेल्या सर्व वस्तूंची महिन्याखेरपर्यंत 4 ते 5 लाखांची उलाढाल (Success Story) होत आहे. तसेच लोकांमध्ये देशी गोवंशाबद्दल जनजागृती निर्माण होत आहे. शेतकऱ्यांना गो आधारित शेतीचे महत्व कळायला लागले आहे. खिलार सारख्या गोवंशाचे संवर्धन होत आहे, असे प्रा. उमा बिराजदार सांगतात.