Success Story : एखाद्या व्यक्तीने अवघ्या 15 दिवसांत 2 कोटी कमावले आहेत आणि लवकरच तो आणखी 1 कोटी कमावणार आहे, असे जर तुम्हाला सांगण्यात आले तर तुमचा देखील या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. मात्र ही गोष्ट खरी आहे. एका शेतकऱ्याने टोमॅटो विकून हा पैसा कमावला आहे. जवळपास 1 महिन्यापासून देशभरात टोमॅटोचे भाव वाढत आहेत. जूनमध्ये 30 ते 40 रुपयांना मिळणारा टोमॅटो 150 ते 200 रुपयांना विकला जात आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला पिकाचा बक्कळ नफा मिळाला आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा
जाणून घ्या कोण आहे हा शेतकरी?
बी महिपाल रेड्डी असे या शेतकऱ्याचे नाव असून ते तेलंगणातील मेडक जिल्ह्यातील कौडीपल्ली मंडलातील मोहम्मद नगर गावचे रहिवासी आहेत. रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या शेतात अजूनही एक कोटी रुपयांचे टोमॅटोचे पीक शिल्लक आहे. रेड्डी म्हणाले की, ते गावात त्यांच्या 20 एकर शेतजमिनीवर भातशेती करायचे. भातशेतीत अनेकवेळा नुकसान झाल्यामुळे आठ वर्षांपूर्वी त्यांनी आठ एकरांवर भाजीपाला पिकवण्यास सुरुवात केली. (Success Story)
महिपाल रेड्डी म्हणाले की ते शेतीमध्ये ठिबक सिंचन आणि ‘स्टेकिंग’ पद्धती वापरतात. ते म्हणाले की जर सर्व काही ठीक झाले तर ते आठवडाभरात त्यांचे सर्व टोमॅटो विकतील. त्यांनी टोमॅटो हैदराबाद आणि त्याच्या बाहेरील भागात बोयनपल्ली, शाहपूर आणि पटांचेरू मार्केटमध्ये विकले आहेत. त्यांना 25 ते 28 किलोच्या टोमॅटोच्या क्रेटसाठी 2,500 ते 2,700 रुपये दर मिळाला. त्यांनी सुमारे 7,000 क्रेट सुमारे 2 कोटी रुपयांना विकले आहेत. त्यामुळे सगळीकडे आता त्यांची चर्चा होत आहे.
शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला दररोजचा बाजारभाव चेक करायचा असेल तर आत्ताच प्ले स्टोअर वर जाऊन आमचे Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा. यामध्ये तुम्हाला रोजचा बाजारभाव तर पाहायलाच मिळेल त्याचबरोबर सरकारी योजना, हवामान अंदाज, पशुंची खरेदी विक्री, जमीन मोजणी इत्यादी गोष्टींची माहिती मिळेल ती ही अगदी मोफत. त्यामुळे आत्ताच प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello krushi हे ॲप इंस्टॉल करा.
टोमॅटोच्या शेडला गेले १६ लाख
तेलंगणामध्ये एप्रिल आणि मे महिन्यात उच्च तापमान असते जे टोमॅटोच्या लागवडीसाठी योग्य नसते. त्यामुळे तापमान आणि हवामानाचा परिणाम नियंत्रित करण्यासाठी त्यांनी आठ एकर टोमॅटो लागवड क्षेत्रात नेट शेड तयार केले. त्यासाठी त्यांना 16 लाख रुपये खर्च आला. यामुळे टोमॅटोचे उच्च उत्पादन आणि दर्जेदार उत्पादन मिळू शकले. होते.
दरम्यान, संततधार पावसामुळे पिकाचे नुकसान होणार असल्याने त्यांना पिकाची चिंता आहे. गेल्या काही आठवड्यात टोमॅटोचे भाव देशभरात गगनाला भिडले आहेत. तेलंगणासह देशातील विविध राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. पावसामुळे रस्ते वाहतूकही खोळंबली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प होत असून, त्यामुळे भाव वाढत आहेत.