Sugarcane Ethanol: ऊस इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटविले!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: देशातील साखर हंगाम संपल्यानंतर उसापासून इथेनॉल (Sugarcane Ethanol) निर्मितीवरील निर्बंध हटविण्यात आले असून देशभरात कारखान्यांकडे शिल्लक असलेल्या ऊस रस आणि मळीपासून तयार होणारे इथेनॉल (Sugarcane Ethanol) खरेदी करण्याचे आदेश पेट्रोलियम कंपन्याना दिले आहेत.

देशातील साखरटंचाई (Sugar Shortage) आणि साखरेच्या दरातील चढउतार टाळण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) 6 डिसेंबर 2023 रोजी उसाचा रस आणि बी-हेवी मोलाईसेस (मळी) पासून इथेनॉल उत्पादन आणि खरेदीवर बंदी घातली होती (Sugarcane Ethanol Ban). 

सर्वप्रथम राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने (Co-operative Sugar Factory Federation) या सर्व बाबी व त्याचे गांभीर्य तातडीने केंद्र शासनाच्या नजरेस आणले आणि त्याच्या फलस्वरूप केंद्राने 15 डिसेंबर 2023 च्या सुधारित आदेशाद्वारे शिल्लक इथेनॉल (Sugarcane Ethanol) आणि काही प्रमाणात बी हेवी मळी याचा इथेनॉल वापरासाठी परवानगी देऊन देशभरातील आसवनी प्रकल्प असणाऱ्या साखर कारखान्यांना अंशतः दिलासा दिला.

केंद्राने ही बंदी घातली त्या वेळी देशभरात सुमारे पाच ते सात लाख टन मळीचा (B- Heavy molasses) साठा शिल्लक होता. त्याचे वेळीच इथेनॉलमध्ये रूपांतर केले झाले नाही तर हा साठा वाया जाणार आहे. याची उपयोग संपण्यापूर्वी इथेनॉल निर्मितीस (Ethanol Production) परवानगी देण्याची विनंती राज्य साखर संघ आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने पंतप्रधान यांच्याकडे केली होती. 

त्याच्या परिणामस्वरूप केंद्र शासनातील संबंधित मंत्रालयातील विभागांमध्ये तातडीने हालचाली सुरू झाल्या आणि दिनांक 24 एप्रिल रोजी केंद्र शासनाकडून सुमारे 7 लाख टन शिल्लक बी हेवी मळीचा वापर इथेनॉलकडे करण्याचा परवानगी देण्यात आली असून आसवानी निहाय 31 मार्च अखेरच्या बी हेवी मळीच्या मात्रेतून तयार होणाऱ्या इथेनॉलची खरेदी (Ethanol Purchase) करण्याचे आदेश केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे (Union Petroleum Ministry) पारित होण्याची प्रक्रिया सुरु झाली होती.

पहिल्या टप्प्यात 66 कोटी लिटर इथेनॉल खरेदी करणार (Sugarcane Ethanol)
देशातील साखर हंगाम संपल्यानंतर आता हे निर्बंध हटविण्यात आले असून देशभरात कारखान्यांकडे (Sugar Factory) शिल्लक असलेल्या ऊस रस आणि मळीपासून तयार होणारे इथेनॉल खरेदी करण्याचे आदेश पेट्रोलियम कंपन्याना दिले आहेत. विविध तेल कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे 66 कोटी लिटर इथेनॉल (Sugarcane Ethanol) खरेदी करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे.