हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल (Swadhar Yojana 2024) आणि कमी उत्पन्न गटातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही, तसेच या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करताना अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांना समोर जावे लागते, त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणामध्ये अडथळा निर्माण होतो. अशा होतकरू आणि गुणवंत अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध वर्गातील गरीब विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करता यावे, तसेच त्यांना त्यांचे उज्ज्वल भविष्य निर्माण करता यावे, यासाठी अशा विद्यार्थ्यांना भोजन आणि निवासाची सोय (Food and accommodation Subsidy) व इतर शैक्षणिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) सामाजिक न्याय व विशेष विभागांतर्गत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या’ (Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana 2024) माध्यमातून अनुदानाच्या स्वरुपात या विद्यार्थ्यांची आर्थिक सहायता केली जाते (Maharashtra Government Scheme).
स्वाधार योजनेची वैशिष्ट्ये (Swadhar Yojana 2024)
- या योजनेच्या अंतर्गत इयत्ता 11वी आणि 12वी मध्ये शिकणारे तसेच इयत्ता अकरावी आणि बारावी नंतरच्या व्यावसायिक (professional Courses) आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकिय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित (Scheduled Castes) आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना (SC Students) त्यांना शिक्षण घेण्यात सहायता करण्यासाठी महाराष्ट्र स्वाधार योजना अंतर्गत अनुदानाच्या रुपात आर्थिक मदत केल्या जाते.
- स्वाधार योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील विद्यार्थ्यांना निवास, भोजन आणि इतर शैक्षणिक खर्च यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रतिवर्षी 51,000/- रुपये अनुदान म्हणून आर्थिक सहायता केली जाईल.
- वर नमूद केलेल्या मदतीव्यतिरिक्त वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000/- रुपये आणि अन्य अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 2,000/- रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल.
- स्वाधार योजने (Swadhar Yojana 2024) अंतर्गत विद्यार्थी इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वी मध्ये शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि त्याप्रमाणे विद्यार्थी पदवी, डिप्लोमा तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेसाठी विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी किंवा 12वी, पदवी/पदविका परीक्षेमध्ये 60 टक्के पेक्षा जास्त असणे अनिवार्य आहे.
- अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी (Disabled Students) ही मर्यादा 50 टक्के असेल.
स्वाधार योजना 2024 आवश्यक कागदपत्रे (Swadhar Yojana 2024)
- अधिकृत जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्डाची प्रत
- महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र ( अधिवास प्रमाणपत्र / रेशनकार्ड / निवडणूक ओळखपत्र / जन्म तारखेचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही)
- बँकेत खात्याचा पुरावा म्हणून बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची प्रत
- तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला किंवा वडील नोकरीत असल्यास फॉर्म नंबर 16
- विद्यार्थी दिव्यांग असल्यास त्या बाबतचे प्रमाणपत्र
- इयत्ता 10वी, 12वी किंवा पदवी परीक्षेचे गुणपत्रिका
- महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
- विद्यार्थिनी विवाहित असल्यास पतीच्या उत्पन्नाचा दाखला.
- बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याबाबतचा पुरावा
- विद्यार्थ्याने कोणत्याही शासकिय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्या बाबतचे शपथपत्र
- स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
- वर्तमान रहिवासी पत्ता पुरावा
- महाविद्यालयाचे उपस्थितिचे प्रमाणपत्र
- सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत
महाराष्ट्र स्वाधार योजनेत (Swadhar Yojana 2024) अर्ज करण्यासाठी https://sjsa.maharashtra.gov.in/ या वेबसाईट ला भेट द्या.
- अधिकृत वेबसाईट :– इथे क्लिक करा
- स्वाधार योजना माहिती PDF :– इथे क्लिक करा
स्वाधार योजना फॉर्म PDF :– डाऊनलोड