Tata Intra Pickup : सीएनजी पेट्रोलवर चालणारा छोटा हत्ती; ज्याला आहे शेतकऱ्यांची पहिली पसंत!

Tata Intra Pickup For Farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये मालवाहतुकीसाठी सर्वाधिक पीकअपचा (Tata Intra Pickup) उपयोग केला जातो. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना छोटा हत्तीचा (पीकअप) वापर शेतीसह सर्वच वाहतुकीसाठी होतो. त्यामुळे आता तुम्ही देखील एखादा छोटा पिकअप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ‘टाटा इंट्रा वी 20 पिकअप’ तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे. भारतातील एकमात्र असा छोटा पिकअप आहे जो पेट्रोल आणि सीएनजी असा दोन्हीच्या मदतीने चालवला जाऊ शकतो. या छोट्या पीकअपच्या मदतीने शेतकऱ्यांना दूध वाहतूक, शेतमाल वाहतूक अशा सर्वच गोष्टींची वाहतूक करता येणार आहे. त्यामुळे आज आपण ‘टाटा इंट्रा वी 20 पिकअप’बद्दल (Tata Intra Pickup) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

‘टाटा इंट्रा वी 20 पिकअप’ बद्दल (Tata Intra Pickup For Farmers)

‘टाटा इंट्रा वी 20 पिकअप’ (Tata Intra Pickup) हा 1199 सीसी क्षमतेसह उपलब्ध असून, त्याला तीन सिलेंडर देण्यात आले आहे. याशिवाय या छोट्या पीकअपला एनजीएनए बायफ्युएल सीएनजी बीएस-6 फेज 2 इंजिन देण्यात आले आहे. जे 58/53 एचपी पॉवरसह 106/95 एनएम टॉर्क जनरेट करते. या पिकअपला कंपनीने 15 ते 17 किलोमीटर प्रति लिटर आणि 300 ते 800 किलोमीटर सीएनजी रिफ्यूलिंगसह मायलेज देण्यात आले आहे. याशिवाय कंपनीने या पीकअपला 110/35 लीटर क्षमतेची इंधन टाकी दिलेली आहे. तसेच कंपनीकडून या पीकअपला 80 किमी प्रति तास इतका सर्वाधिक वेग देण्यात आला आहे. ही पीकअप 930/1000 किलोग्रॅम वजन उचलू शकते. तर तिचे एकूण वजन 2295 किलोग्रॅम इतके आहे. कंपनीने या पीकअपला 2450 एमएम व्हीलबेसमध्ये तयार केले आहे.

‘टाटा इंट्रा वी 20 पिकअप’चे फीचर्स

‘टाटा इंट्रा वी 20 पिकअप’मध्ये कॉलम माउंटेड इलेक्ट्रिक पॉवर असिस्टेड एसटीजी सिस्टम स्टीयरिंग देण्यात आला आहे. ज्यामुळे ड्रायव्हरला चालवताना आरामदायी अनुभव प्रदान होतो. या टाटा पीकअपला जीबीएस 65 सह पुढील बाजूस 5 आणि मागील बाजूस 1 रिव्हर्स गिअर देण्यात आला आहे. कंपनीचा हा पीकअप एलिप्टिकल लाइफ स्प्रिंग आणि रियर सस्पेंशनसह उपलब्ध आहे. या पीकअपला ड्रायव्हरसह एक सीट देण्यात आली आहे. कंपनीने आपल्या या पीकअपला ईको मोड स्वीच आणि गियर शिफ्ट एडवाइजर दिला आहे. ज्यामुळे चांगले मायलेज मिळण्यास मदत होते. ‘टाटा इंट्रा वी 20 पिकअप’ला पुढील बाजूस 165 R14 LT 8PR टायर आणि मागील बाजूस 165 R14 LT 8PR टायर दिले आहे.

‘टाटा इंट्रा वी 20 पिकअप’ची किंमत

कंपनीने आपल्या ‘टाटा इंट्रा वी 20 पिकअप’ची शोरूम किंमत 7.15 लाख ते 8.50 लाख रुपये इतकी निर्धारित केली आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्स वेगवेगळा असल्याने, वेगवेगळ्या राज्यांमध्ये या पीकअपची किंमत वेगवेगळी राहू शकते.