Thai ATM Mango : वर्षभर फळे देणारा ‘हा’ एटीएम आंबा तुम्हाला माहितीये का? या पावसाळ्यात लागवड कराच

Thai ATM Mango
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Thai ATM Mango : साधारणपणे मार्च ते जून महिन्यापर्यंत आपल्याकडे आंबा फळाचे उत्पादन मिळते. ह्या हंगामातच फक्त आपल्याकडे आंबा मिळतो. आंब्याचा हा हंगाम सोडला तर वर्षभर आपल्याला आंब्याचा स्वाद चाखता येत नाही. मग आपल्याला कुठलातरी आर्टिफिशियल ज्यूस पिऊन समाधान मानावे लागते. मात्र, वर्षभर फळे देणारी आंब्याची एक जात आहे, तिला ‘एटीएम’ म्हणजेच ‘एनी टाईम मँगो’ असे म्हटले जाते. या आंब्याच्या रुमानी, थाई या वर्षभर फळे देणाऱ्या जाती आहेत. यापैकी थायलंडची थाई ही जात चांगली मानली जाते. अनेक शेतकरी आता या आंब्याच्या लागवडीकडे वळत आहेत.

खात्रीशीर अन जातीवंत रोपे कशी विकत घ्यावीत?

शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा एखादं पीक घेतो तेव्हा त्यावर कित्तेक महिने मेहनत घेतो. पण ज्याचं पीक आपण लावलंय ते रोप चांगल्या क्वालिटीचं आहे का हे आपण अनेकदा पाहत नाही. बियाणे किंवा रोपं विकत घेताना आपण एक दोन रोपवाटिकांमध्येच चौकशी करतो. शेतातल्या कामातून आपल्याला अनेकदा त्यासाठी वेळहि मिळत नाही. पण जर तुम्हाला कमी किंमतीत खात्रीशीर अन जातिवंत रोपे विकत घ्यायची असतील तर Hello Krushi हे मोबाईल अँप बेस्ट आहे. कारण या अँपवर तुम्हाला तुमच्या गावाच्या जवळील सर्व रोपवाटिकांसोबत संपर्क करण्याची सुविधा आहे. तुम्ही एका क्लिकवरून महाराष्टरातील कोणत्याही रोपवाटिका मालकाशी संपर्क करून सदर रोपवाटिकेत तुम्हाला हवी ती रोपे आहेत का हे चेक करू शकता. तसेच योग्य किमतीत रोप विकत घेऊ शकता. अनेक रोपवाटिका शेतकऱ्यांना फ्री होम डिलिव्हरीसुद्धा देतात. तेव्हा आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर ओपन करा आणि Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या.

थाई आंब्याची वैशिष्ट्ये काय आहेत?

थाई जातीचे आंबे आकाराने लांब व चवीने गोड असतात. बिगर हंगामात या आंब्याला चांगली मागणी असते. या जातीचे आंबे पिकल्यावर पिवळे दिसतात. या आंब्याची साल पातळ असते. गराचे प्रमाण जास्त असते. या झाडाच्या एका घोसाला दहा ते बारा आंबे लागतात.

वर्षभर लागणारे आंबा कलम/Thai ATM Mango (All Time Mango)

या आंब्याची लागवड कुंडीतही करता येते. पाच वर्षे वयाच्या झाडापासून २०० ते २५० आंबे मिळतात. महाराष्ट्रात सगळ्या भागात या आंब्याची लागवड होऊ शकते. परंतु, ज्या भागात केशर आंबा चांगला येतो, त्या भागातील हवामान थाई किंवा रुमानी आंब्याच्या लागवडीसाठी पोषक असते.

रुमानी जातीचे आंबे हे थाई जातीच्या आंब्यापेक्षा आकाराने मोठे असले तरी थाई जातीचे आंबे चवीला गोड असतात. कैरीसाठी रुमानी आंबा चांगला मानला जातो.
शेतकऱ्यांनी योग्य मार्गदर्शन व बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन या आंब्याची लागवड केल्यास चांगला फायदा होऊ शकतो.

Rahul Bhise
Bsc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झालेले असून शेती क्षेत्रात वार्तांकन करण्यामध्ये विशेष आवड. यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा, शासकीय योजना, शेती प्रश्न आदी विषयांवर लिखाण करण्यात रस.