सोयाबीन वाहतुकीसाठी कृषी विभागाने घातली ‘हि’ अट

Tractor Market Yard
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांनी वाहतूक करताना सात बॅग पेक्षा मोठी थप्पी लावू नये, अशी अट टाकण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा मोठी थप्पी आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

मागील हंगामात निकृष्ट बियान्यांमुळे सोयाबीनची उगवण न झाल्याच्या 62 हजारांहून जादा तक्रारी कृषी विभागाकडे आल्या होत्या. त्यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी काही जिल्ह्यांमध्ये निदर्शने केली होती. त्यात पुन्हा उच्च न्यायालयाने स्वतःहून हस्तक्षेप करीत एक जनहित याचिका दाखल केली होती. त्यामुळे राज्य सरकारने 54 ठिकाणी सदोष अभियान बाबत फौजदारी गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे कृषी विभागाने आतापासूनच सावध होत आता नव्या अटी लागू केल्या आहेत.

सोयाबीन बियाण्याचे आवरण नाजूक असल्याने बियाण्याच्या उगवणीवर परिणाम होतो. त्यामुळे बियाण्याचे वाहतूक व साठवणूक करताना सात बॅगापेक्षा जास्त मोठी थप्पी लावू नये. बियाणे विक्रेत्यांनी त्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापकांकडे मागणी करावी व दहा टनापेक्षा जास्त बियाणे एका वाहनातून न पाठविण्याबाबत कळवावे असा आदेश कृषी विभागाने जारी केला आहे. त्यामुळे कंपन्या विक्रेत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

शेतकरी मित्रांनो हे पण वाचा –

सोयाबीनला मिळतोय सरासरी 6000 भाव; घरातच सोयाबीनची साठणूक करण्याऱ्या शेतकऱ्यांना फायदा

रासायनिक खतांना उत्तम पर्याय हिरवे खत

तुमच्या ग्रामपंचायतीचा निधी कुठे खर्च झाला? एका क्लिक वर कसे जाणून घ्याल