हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीसाठी जालना जिल्हा प्रशासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जालन्यात गेल्या काही वर्षांपासून रेशीम शेतीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. शिवाय यातून शेतकऱ्यांना पुरेसे उत्पन्न देखील मिळत आहे. शेतकऱ्यांना उत्पादन वाढीची संधी देत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी बैठक घेतली. या बैठकीदरम्यान यंदा तब्बल 1800 एकरावर तर येत्या 5 वर्षामध्ये 5 हजार एकरावर तुती लागवड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.
कसे आहे प्रशासनाचे नियोजन?
–जालना जिल्ह्यात या महिन्यातच पोकरा, मनगेरा, शेतकऱ्यांच्या रोपवाटिका आणि वनीकरण विभागाच्या रोपवाटिका या माध्यमातून 55 लाख तुतीची रोपे तयार करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
–महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तीन वर्षांसाठी तुती लागवडी व कीटक संगोपन गृह बांधकामासाठी मंजुरी व सामग्रीसाठी प्रतिएकर 3 लाख 32 हजार 740 रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
–कृषी विभागाच्या पोकरा योजनेअंतर्गत रेशीम शेतीसाठी लाभ देण्यात येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
— सातबारा, 8 अ नमुना,
–आधार कार्ड,
— बॅंक पासबुकची झेरॅाक्स,
–दोन फोटो आणि रेशीम मंडळाच्या अर्जाचा नमुना