हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकरने पीक पाहणी करिता ऍप विकसित करून दिले असून त्याद्वारे अनेक शेतकरी नोंदणी करत आहेत. मात्र काही शेतकऱ्यांना नोंदणीसाठी अडचणी येत असल्याचेही दिसून येत आहे. मात्र या अद्यावत तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. ई पीक पाहणीच्या ऍपद्वारे केलेली नोंद सातबाराच्या उताऱ्यावरही येणार आहे.
कशी कराल ई-पिक पाहणी
१) शेतकऱ्यांनी प्ले स्टोअर मधून ‘ई-पीक पाहणी’ असं नाव टाकून हे अॅप डाऊनलोड करुन घ्यायचे आहे. त्यानंतर हे अॅप ओपन केल्यानंतर ई-पीक पाहणी नावाचे होम पेज ओपन होईल. यामध्ये जमाबंदी आयु्क्त व संचालक, भूमी अभिलेख कार्यालय, महसूल विभाग, महाराष्ट्र शासन. ई-पाक पाहणी प्रकल्प संपूर्ण राज्यात राबवण्यात येत आहे असं नमूद केलंल असेल.
२) याला डावीकडे सरकवल्यास हे अॅप वापरण्यासाठी लागणारी माहिती तिथं दिलेली असेल. पुन्हा एकदा डावीकडे सरकवल्यास पिकांची नोंदणी करण्यासाठी ज्या बाबींची मदत होऊ शकेल, त्या दिलेल्या असतील. जसं की सातबारा उतारा, 8-अ इत्यादी. त्यानंतर येथे असलेल्या पुढं या पर्यायावर क्लिक करायंच आहे.
३) नविन खातेदार नोंदणी करुन घ्यावयाची आहे. यामध्ये आपला जिल्हा, तालुका आणि गावाची निवड करयाची आहे. त्यानंतर खातेदारमध्ये पहिले नाव, मधले नाव, अडनांव आणि गट क्रमांक टाकायचा आहे. गट क्रमांक टाकल्यानंतर शेतकऱ्याचे नाव समोर येते. त्यानंतर खातेक्रमांक तपासून आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो पुन्हा बदलता येणार नाही.
४) त्यानंतर मोबाईलवर चार अंकी पासवर्ड येईल तो कायम लक्षात ठेवावा लागणार आहे. कारण या अॅपमध्ये तोच पासवर्ड लागणार आहे तो एसएमएस द्वारे पाठवला जाईल. यानंतरच तुमची नोंदणी यशस्वी होणार आहे. यानंतर अॅप हे पूर्णपणे बंद करुन चालू करायचे आहे.
५) अॅप पुन्हा चालू केल्यानंतर ई-पीक पाहणीच्या नोंदणीला येथूनच खरी सुरवात होते. पुन्हा तुम्हाला खातेदार म्हणजे तुमचे नाव निवडावे लागेल. मॅसेजद्वारे आलेला पासवर्ड येथे नमूद करायचा आहे. त्यानंतर पुढे जाऊन परीचयमध्ये खातेदाराचा फोटो अपलोड करायचा त्यानंतर दिलेली माहिती भरून सबमिट करायचे.
६) त्यानंतर होममध्ये येऊन पिकाची माहिती नोंदवा असा एक फॅार्म येतो. यामध्ये खातेक्रमांक नंतर गट क्रमांक, जमिनीचे क्षेत्र हे हेक्टरमध्ये भरायचे यानंतर हंगाम निवडायचा म्हणजे खरीप की संपूर्ण वर्ष ते निवडायचे, त्यानंतर पिक पेरणीसाठीचे क्षेत्र किती याचा उल्लेख करायचा आहे. त्यानंतर पिकाचा वर्ग यामध्ये जे आपलं मुख्य पिक आहे तेच निवडायचे यामध्ये दुय्यम पीकाचाही उल्लेख करता येणार आहे.
७) त्यानंतर दिलेल्या पर्यापैकी तुमचं कोणतं पिक ते निवडायचे आहे. निवडलेल्या त्या पिकाचे क्षेत्र भरायचे.. त्यानंतर सिंचनाचे साधन काय आहे त्याचा उल्लेख करायचा त्यानंतर ठिबक पध्दती कशी आहे याची दिलेल्या पर्यातून निवड करायची..त्यानंतर पिक लागवडीची तारीख याची नोंद करायची.
८)ही सगळी माहिती भरुन झाली की आपण वरती जे मुख्य पीक सांगितले आहे त्याचा फोटो काढायचा आणि तो फॅार्म सबमिट करायचा आहे. सबमिट झाल्यानंतर पुन्हा होमवर यायचं ही नोंदवलेली माहिती केवळ तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाली.. ती बघायची असेल तर पुन्हा पिकाची माहिती नोंदवा याच्यावर क्लिक करायचे आहे. यामध्येही पिकाची माहिती यावर क्लिक करयाचे यामध्ये तुम्ही भरलेली माहिती दिसेल जी मोबाईलमध्ये सेव्ह झालेली असेल ही माहिती संबंधित सर्वरला पाठवण्यासाठी अपलोड या बटनाला क्लिक करायचे आहे.
९) त्यानंतर आलेल्या दोन पर्यापैकी परिचय माहिती क्लिक करुन माहीती अपलोड झालेली पहायला मिळते त्याच प्रमाणे पिक माहितीवरती क्लिक करुन अपलोड करायचे आहे…अशा प्रकारे ‘ई-पिक पाहणी’ या अॅपद्वारे आपल्याला पिकाची माहिती भरता येते.
१०) आता तुम्हाला दुसऱ्या एखाद्या गटातल्या किंवा इतरही पिकांची नोंद करायची असेल तर + या बटनावर क्लिक करून वरी केलेली प्रक्रिया पुन्हा करावी लागणार आहे.. अशाचप्रकारे या अॅपवरून तुम्ही कायम पडिक जमिन, बांधावरची झाडंही नोंदवू शकता. या भरलेल्या माहिती छाननी तलाठी कार्यालयात केली जाईल आणि मग सातबाऱ्यावर या पिकांची नोंद होईल.
संदर्भ -टीव्ही -९