हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या खेड्यांमध्ये राहते, भारतात लोक मोठ्या प्रमाणावर शेती करतात. आता जेव्हा शेतीचा विचार केला जातो तेव्हा मान्सून हे नाव आपसूकच घेतले जाते. कारण शेतीमध्ये मान्सून किती महत्त्वाचा आहे हे शेतकरी बांधवांना चांगलेच माहीत आहे. स्पष्ट शब्दांत सांगायचे झाले तर, भारतात उगवलेली सर्व पिके मान्सूनवर अवलंबून आहेत. जर आपण मध्य भारतातील राज्यांबद्दल बोललो तर ते पावसावर अवलंबून असलेल्या शेतजमिनींनी भरलेले आहे. एकूणच, मान्सून शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या पेरणीसाठी खूप मदत करतो. संपूर्ण वर्षभराचे अन्नधान्य पिकवण्यासाठी मान्सून खूप महत्वाची भूमिका बजावतो. मान्सूनच्या आगमनावर शेतकऱ्यांची पेरणी ठरलेली असते. तेव्हा शेतकरी त्यांच्या शेतात खूप सक्रिय होतात. त्याच वेळी, बहुतांश शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीची तयारी सुरू करतात. आजच्या लेखात जाणून घेऊया शेतीमध्ये का आहे मान्सूनला महत्व ?
२०२२ मधला मान्सून
मान्सूनची स्थिती जाणून घेणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण मान्सूनचे आगमन, तीव्रता, कालावधी आणि माघार यामध्ये दरवर्षी चढ-उतार होत असतात. कधी मान्सूनच्या पावसाला उशीर होतो, कधी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे चांगले उत्पादन आणि नुकसान अवलंबून असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मान्सूनचा अंदाज जाणून घेणे गरजेचे आहे. 2022 सालाबद्दल बोलायचे झाले तर, या वर्षीचा मान्सून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे, कारण अनेक वर्षानंतर मान्सून सामान्य राहू शकतो. हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, या वर्षी मान्सून सामान्य राहू शकतो. त्याचबरोबर यंदा सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेटने असेही म्हंटले आहे की, मान्सूनचा तपशीलवार अंदाज करण्यासाठी डेटा गोळा करत आहे आणि एप्रिलमध्ये अंदाजाचा तपशीलवार अहवाल जारी करेल. स्कायमेटने वर्तवलेला हा प्रारंभिक अंदाज आहे.
मान्सूनचा कृषी उत्पादनावर परिणाम
शेतकरी शेतीसाठी मान्सून वर अवलंबून असतात. अनेक पिकांच्या पेरणीसाठी पावसाची गरज आहे. मान्सूनची स्थिती सामान्य राहिल्यास शेतीचे उत्पादन चांगले होते. शेतकऱ्यांना चांगले कृषी उत्पादन मिळाले, तर त्यामुळे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्थाही चांगली सुधारते. शेतकऱ्यांच्या खिशात पैसा येतो. अशी अनेक क्षेत्रे आहेत, ज्यांच्या कंपन्यांवर मान्सूनचा प्रभाव दिसून येतो. मान्सूनमुळे ग्रामीण भारताची अर्थव्यवस्था सुधारली तर भारताच्या जीडीपीला चांगला फायदा होतो, कारण ग्रामीण भारताच्या अर्थव्यवस्थेत जीडीपीचा मोठा वाटा आहे.