गाळपाअभावी शिल्लक ऊस फडातच…! साखर आयुक्तांचे पत्र लावणार का प्रश्न मार्गी ?

sugercane
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा उसाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. तर १२ लाख ३२ हजार हेक्टरवरील उसाच्या गाळपाचे उद्दिष्ट आहे. यंदाचा हंगाम चांगला झाला असला तरी अद्यापही बऱ्याच क्षेत्रातला ऊस फडातच आहे. त्यामुळे साखर आयुंक्तानी कारखान्याकडे नोंद झालेला अथवा न झालेल्या ऊसाचे गाळप पूर्ण करण्याच्या अनुशंगाने साखर कारखान्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. असे असूनही हंगाम पूर्ण होण्याअगोदर जर ऊसाचे गाळप न झाल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित कारखान्याचे संचालक यांच्यावर असणार आहे. उद्दीष्टपूर्ती झाली की, साखर कारखान्यांकडून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळेच साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर कारखान्यांना एक परिपत्रक जारी केले असून यामध्ये अशा सूचना केल्या आहेत.

नियम डावलणाऱ्या कारखान्यांवरच शिल्लक उसाची जबाबदारी

–साखर आयुक्त कार्यालयाच्या परवानगीशिवाय गाळप हंगाम कारखान्यांना बंद करता येत नाही.
–गाळप बंद करण्यापूर्वी आयुक्त कार्यालयाला कळवावे लागणार आहे.
–यासंदर्भात जाहीर निवेदन काढून शेतकरी आणि सभासद यांनाही त्याची माहिती द्यावी लागणार आहे.
–या संदर्भात 21 जुलै 2021 रोजीच कारखान्यांना पत्र गेले आहेत.
— शिवाय जे कारखाने हा नियम डावलून गाळप बंद करतील त्यांच्यावरच या शिल्लक ऊसाची जबाबदारी राहणार आहे.
–मग ऊसाची नोंद कारखान्याकडे असो अथवा नसली तरी कार्यक्षेत्रातील ऊसाची जबाबदारी कारखान्यावर राहणार आहे.