‘जीआय’ च्या नावाखाली बनावट शेतीमालाची विक्री पडणार महागात ; खावी लागणार थेट जेलची हवा , पणन संचालकांचे निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या फळांचा राजा आंब्याचा हंगाम सुरु आहे. मात्र सर्वांचा आवडता असणाऱ्या हापूस आंब्याच्या नावाखाली इतर आंब्यांची सर्रास विक्रि होत असलेली अद्यापही पहायला मिळत आहे. मुंबईच्या बाजारपेठेत जी आय मानांकन असलेल्या हापूसच्या नावाने इतर आंब्याची विक्री होत असल्याने पणन संचालकांनी याबाबत कडक धोरण आखले आहे. आता ‘जीआय ‘ च्या नावाखाली बनावट शेतमालाची विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहकांची फसवणूक टळणार आहे. असे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित बाजार समित्यांनी ही कारवाई करण्याच्या सूचना पणन संचालकांनी दिल्या आहेत. ग्राहकांकडून हापूस आंब्याची मागणी होत असताना इतर राज्यातून येणार आंबाही हापूस असल्याचे भासवत विक्री केली जात आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कारवाईच्या धास्तीने असे प्रकार कमी होतील असा अंदाज आहे.

गेल्या काही दिवसांपासूनअसे प्रकार समोर येत असल्याने पणन संचालकांना असा निर्णय घ्यावा लागला आहे. बाजार समित्यांबरोबर शेती उत्पादक कंपन्या, शेती बचतगट यांनाही सूचना करण्यात आल्या आहेत. या जीआय उत्पदनाची महिती ही ग्राहकांपर्यंत पोहचवावी लागणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जीआय अंतर्गत बागांची नोंद करावी लागणार आहे. शेतकऱ्यांना बागा आणि उत्पादनाचा क्यूआर कोड तयार करावा लागणार आहे. एवढेच नाही तर वेबसाईटवर नोंदणीधारक बागा आणि शेतकऱ्यांची यादी प्रसिध्द करावी लागणार आहे. यामुळे जीआय उत्पादक मालच ग्राहकांपर्यंत पोहचेल असा विश्वास आहे.