शॉर्टसर्किटमुळे दहा ते बारा एकर उसाबरोबरच टॅक्टरही जळाला ; नुकसानभरपाईची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शॉर्ट सर्किटच्या घटनेमुळे आग लागल्याच्या अनेक घटना घडूनही महावितरणचे डोळे काही उघडलेले दिसत नाहीत. पुण्यातील नारायणगावात महावितरणच्या गलथान कारभारामुळे जवळपास १०-१२ एकर ऊस जळून खाक झाला आहे. एवढेच नाही तर यात शेतीच्या कामासाठी वापरण्यात आलेला ट्रॅक्टर देखील जाळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पुण्यातील नारायण गाव येथील काळमजाई मळ्यात अचानक आग लागली. शेतीच्या जवळपास वस्तीसाठी कुणीही नसल्यामुळे आग लागल्याच्या घटनेची माहिती लवकर मिळाली नाही. आग धुमसत गेल्यामुळे जवळपास १०-१२ एकर ऊस जळून खाक झाला. असा प्राथमिक अंदाज आहे. तसेच जवळपास असणारा रोहिदास भोर यांचा ट्रॅक्टर देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अर्जुन भोर, विठ्ठल भोर, विष्णु भोर, इंदुबाई कुरकुटे, हनुमान खंडागळे आणि बारकु भोर या शेतक-यांचा ऊस जळाला आहे. याबाबतची नुकसानभरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. दरम्यान आगीच्या घटनेनंतर घटनास्थळी चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी तात्काळ कारखान्याचे खोडद गटप्रमुख रमेश जाधव, फिल्डमन पवन गाढवे यांना पाठवुन पाहणी करुन दोन दिवसात जळालेल्या उसाची तोडणी करणार असल्याचे सांगितले.