हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, मका उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक भिती ही लष्करी आळीची असते. केवळ भारतातच नाही तर जगभरातील मका उत्पादक शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे. अमेरिकन लष्करी आळी चा बंदोबस्त करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा शोध सुरु असून आता अमेरिकन लष्करी आळीला बाल्यावस्थेतच नियंत्रण करण्यावरून संशोधन सुरू झाले आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऑक्सिटेक आंतरराष्ट्रीय संशोधन समूहांना या अळीचा जीएम नर पतंग विकसित केला आहे. त्यामुळे आळी बाल्यावस्थेतच त्यावर नियंत्रण केले जाणार आहे. त्यामुळे भविष्यातील नुकसान टळणार आहे. त्यामुळे भविष्यात अमेरिकन लष्करी आळी पासून पिकांची सुटका होऊ शकते.
ब्रझीलमध्ये मका पिकाचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. याच देशानं ऑक्सीटेक कडून सुरू असलेल्या चाचण्यांची संमती दिली आहे. जगातील ब्राझील असा देश आहे ज्यांना या चाचण्यांसाठी संमती दर्शवली आहे अमेरिकन लष्करी आळी हा केवळ भारतामधील शेतकऱ्यांसमोर नाही तर जगभरातील शेतकर्यांसमोर आहे.
आतापर्यंत या आळीवर तोडगा काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली जायची. मात्र ऑक्सीटेक या तंत्रज्ञानाने सेल लिमिट इंजिन म्हणजे स्वमर्यादा जनुक असणार आहे. यामध्ये अमेरिकन लष्करी अळी जनुकीय सुधारित नर पतंग विकसित केले गेले आहे यामुळे पतंगावर आधारित पुढील पिढीतील मादी पिलांना प्रौढावस्थेत जाण्यापासून रोखले जाऊ शकतो म्हणजे आळी बाल्यावस्थेतच राहिल्याने तिचा प्रादुर्भाव इतर पिकांवर होणार नाही. सध्या यावर संशोधन सुरू आहे. मात्र या संशोधनाबाबत सर्वसामान्य शेतकऱ्यांना ही उत्सुकता लागून आहे. कारण सर्वाधिक मका पिकाला धोका या आळी मूळ निर्माण होतो या आळी मूळ संपूर्ण पिकच उध्वस्त होतं त्यामुळे जर संशोधन यशस्वी झालो तर शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.