कोकण ,मुंबईवर आजही दाटले काळे ढग; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बहुतेक भागात मागील २/३ आठवड्यांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मागील दोन दिवसात कोकण , मुंबई या भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईत दरड, भिंत कोसळल्याची घटना घडल्याने नागरिकांनाच बळी देखील गेले आहेत . हवामान विभागाचे तज्ञ् के. एस होसाळीकर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी ८. ३० ला मिळालेल्या सॅटेलाईट अपडेट नुसार मुंबई , संपूर्ण कोकण पट्टा , ठाणे या भागवरती दाट ढग दाटून आल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. त्याचबरोबर आरबी समुद्राला लागून अति खोल ढग दाटले आहेत. अशी देखील माहिती दिली आहे. त्यामुळे या भागात आज देखील पावसाची शक्यता आहे.

कुठे किती पाऊस ?

मागील २४ तासात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे या भागात जोरदार पाऊस झाला आहे. रत्नागिरी 137, मंडणगड 142, दापोली 243, चीपळून 73, राजापूर 118, लांजा 205, गुहागर 167, देवरूख 83, आणि खेड 89 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे
पालघर जिल्ह्यातील डहाणू इथं 7.5, तलासरी 82, विक्रमगड 215, जव्हार येथे 192, वाडा येथे 109, पालघर 31, वसईत 42, मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
तर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड ते 56, भिवंडी इथे 155, उल्हासनगर सर्वात जास्त चारशे कल्याण 180, शहापुरी 200 मिली मीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

विदर्भात पुढील पाच दिवस जोरदार पाऊस

विदर्भात पुढील पाच दिवसात विदर्भातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह माध्यम ते जोरादार पावसाची शक्यता नागपूर वेधशाळेने व्यक्त केली आहे. भंडारा, चंद्रपूर, वाशिम, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या वेगळ्या तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आधी माहिती नागपूर हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दिनांक १८ जुलै ते २२ जुलै दरम्यान हवामान विभागाकडून विदर्भात सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे .

 

या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

पुढच्या चार ते पाच दिवस कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. महाराष्ट्राची किनारपट्टी ते कर्नाटकच्या किनारपट्टी दरम्यान कमी दाबाच्या पट्ट्याची द्रोणीय स्थिती आहे. तसेच अरबी समुद्राच्या उत्तर भाग ते आंध्र प्रदेशचा किनारपट्टी दरम्यान पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्याचं रुपांतर चक्रीय वाऱ्यांमध्ये होण्याची शक्यता असून हा पट्टा उत्तर महाराष्ट्र ते तेलंगणा पर्यंत आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून 3.1 आणि 4.5 किलो मीटर उंचीवर आहे. ही स्थिती कोकणातील जोरदार पावसासाठी पोषक ठरत असल्याने अनेक भागात पाऊस पडत आहे.