हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, तुमच्या जमीनीमध्ये कीडनाशकाचा आढळ आहे की नाही हे जर तुम्हाला काही सेकंदात कळालं तर किती बरं होईल ना?… आता हे सांगणारे तंत्रज्ञान लवकरच उपलब्ध होणार आहे.चंदीगड येथील पंजाब विद्यापीठातील चार संशोधकांनी तंत्रज्ञान विकसित केले आहे. कोणत्याही महागड्या उपकरणाचा वापर न करता, प्रयोग शाळेत न जाता घरच्या घरी कोणाही व्यक्तीस काचेची पट्टी वापरून फक्त पाच ते सात रुपयात हे तंत्रज्ञान वापरणे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानासाठी पेटंटची प्रक्रियादेखील अंतिम टप्प्यात असून प्रोविजनल प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
पाणी माती व एकूणच पर्यावरणात कीडनाशकांचे अवशेष राहण्याची समस्या सर्वत्र आहे. या प्रदूषणामुळे मानवी व पर्यावरणीय आरोग्याला गंभीर बाधा होते शेत मालाची परदेशात निर्यात करते वेळी त्यातील रासायनिक अवशेषांचे तपासणी केली जाते. मात्र एरवी माती तसेच शेतीसाठी वापरण्यात येणारे व घरगुती पिण्याचे पाणी यातील कीडनाशकांचा आढळ सहसा तपासला जात नाही. अर्थात त्यासाठी महागडी उपकरणे तंत्रज्ञान प्रयोगशाळा यांचा आधार घ्यावा लागतो. त्याला खर्चही मोठा असतो. अलीकडच्या काळात कर्करोग तसंच अन्य विकारांचा प्रमाण वाढले आहे. त्याला कारणीभूत अनेक कारणांपैकी कीडनाशकांचा असंतुलित वापर हे कारण आहे. या सर्व बाबींचा विचार करून चंदीगड येथील पंजाब कृषी विद्यापीठातील संशोधकांनी पाणी व माती यातील कीडनाशकांचा आढळ सांगणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
बायो फिजिक्स विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. नेहा सिंगला, याच विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर रवी प्रताप वर्णवाल, बायोकेमिस्ट्री विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ विशाल अग्रवाल, डॉ. गुरपाल सिंग अशी त्यांची नावे आहेत. याबाबत बोलताना सिंगला म्हणाल्या की, किटच्या व्यवसायिक विक्रीसाठी अधिकृत संमतीची गरज आहे. तसेच पेटंटची पूर्ण प्रक्रिया बाकी आहे. या तंत्रज्ञानासाठी विद्यापीठांना पंजाब सरकार सोबत करार केला. त्यामुळे किडीच्या उपलब्धतेबाबत सरकारचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र केवळ पाच ते सात रुपये एवढे अल्प या किटची किंमत आहे. एका नमुना साठी एक पट्टी वापरायची आहे अशा प्रकारे ‘वन स्टेप डिक्टेशन’ करणारे तंत्र आमच्या माहितीनुसार तरी भारतात अद्याप नाही परदेशातही तसे नसावे अशी शक्यता डॉक्टर सिंगला यांनी बोलून दाखवली आहे.