कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोनच्या वापराला मंजुरी, ‘या’ मार्गदर्शक तत्वांचा करावा लागेल अवलंब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकरी आता विविध आत्याधुनिक यंत्रांबरोबर आपल्या शेतात कीटकनाशक फवारणी साठी ड्रोनचा वापर देखील करू शकतात. ड्रोनच्या शेतातील वापरासाठी कृषी मंत्रालयाने मंजुरी दिली असून यासंदर्भात मार्ग्दार्शक तत्वे देखील जारी केली आहेत. ड्रोनच्या वापरासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) जारी केली गेली आहे.

महत्वाच्या बाबी

— पिकांचे संरक्षण करण्यासाठी कीटकनाशकांचा उपयोग ड्रोनद्वारे करता येईल.
–शेती, वनीकरण, पिके नसलेले क्षेत्र इत्यादी पिकाच्या संरक्षणासाठी ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी करता येणार आहे.
–ड्रोनची एसओपी कीटकनाशके अधिनियम 1968 (नियम 43) आणि कीटकनाशके नियम (97) च्या तरतुदीनुसार वनस्पती संरक्षण, संगरोध व साठा संचालनालयाने तयार केली आहे.
–ड्रोन आता शेतीमध्ये औषध फवारणी करताना महत्त्वाचा ठरणार आहे.
–ड्रोनमुळे पीक फवारणीसाठी लागणारं मनुष्यबळ नक्कीच कमी होईल.
— पाण्याचे प्रमाण आणि रसायनांचे प्रमाण ड्रोन वापरण्यापेक्षा कमी होईल.
–एखाद्याला ड्रोनच्या सहाय्याने आपल्या शेतात फवारणी करायची असेल तर त्याला संबंधित अधिकाऱ्यांना 24 तास अगोदर कळवावे लागणार आहे.

मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत?

–जमिनीचं क्षेत्र चिन्हांकित करणे ही ड्रोन ऑपरेटरची जबाबदारी असेल.
–ऑपरेटर केवळ मंजूर कीटकनाशके आणि त्यांचे फॉर्म्युलेशन वापरेल.
–परवानगी दिलेल्या उंचीच्या वर ड्रोन उडवता येणार नाही.
–ऑपरेटरद्वारे प्रथमोपचार सुविधा पुरविल्या जातील.
–ड्रोन उडवण्याासठी आजूबाजूच्या लोकांना किमान चोवीस तास अगोदर माहिती दिली पाहिजे.
–अधिकाऱ्यांना 24 तास अगोदर सूचना देणं आवश्यक आहे.
–ड्रोनद्वारे ज्या भागात फवारणी केली जाणार असेल तिथं इतर व्यक्तीं आणि पाळीव प्राण्यांना प्रवेश देऊ नये.
–ड्रोनचं संचालन करणाऱ्या व्यक्तींना किटकनाशकं, त्यांचा प्रभाव या संदर्भात प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे.
–डीजीसीएने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना
–नियंत्रित एअरस्पेसमध्ये कार्य करण्यासाठी डीजीसीए कडून एक विशेष ओळख क्रमांक (यूएलएन) मिळवावा लागेल. आणि तो ड्रोनला जोडावा लागेल.
–फक्त दिवसाच्या उजेडात ड्रोनचा वापर करा.
–विमानतळ आणि हेलिपोर्ट्स जवळ ड्रोन उडवता येणार नाहीत.
–अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतल्याशिवाय खासगी मालमत्तेवर ड्रोनचा वापर करता येणार नाही.
–केवळ डीजीसीए प्रमाणित चालकांना कृषी ड्रोन उडण्याची परवानगी दिली जाईल.