हॅलो कृषी ऑनलाईन: भारतीय कृषी संशोधन संस्थेने (ICAR) टोमॅटोची (Tomato New Variety) विकसित केलेली ‘पुसा टोमॅटो हायब्रिड 6’ (Pusa Tomato Hybrid 6) ही जात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर एक चांगला पर्याय आहे. हे संकरित वाण केवळ उत्कृष्ट रोग प्रतिकारशक्तीच प्रदान करत नाही तर उच्च उत्पादनाची हमी सुद्धा देते. शेतकऱ्यांसाठी, विशेषतः टोमॅटो लागवडीसाठी कठीण परिस्थितीत ही जात (Tomato New Variety) एक चांगला पर्याय आहे.
खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामासाठी (Tomato For Kharif And Rabi) योग्य, चांगले उत्पादन देणार्या, रोग-प्रतिरोधक वाणाच्या शोधात असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ‘पुसा टोमॅटो हायब्रीड 6’ हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. कमीत कमी जोखीमीत, जास्तीत जास्त नफा देणारा पुसा टोमॅटो हायब्रिड 6 हा वाण शेतकऱ्यांसाठी एक विश्वासार्ह आणि फायदेशीर पर्याय आहे. जाणून घेऊ या वाणाची वैशिष्ट्ये (Tomato New Variety).
चांगल्या रोग प्रतिकारशक्तीमुळे पिकांसाठी संरक्षक ढाल (Diseases Resistant Tomato Variety)
टोमॅटोच्या लागवडीतील सर्वात नुकसानकारक बाबा म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव, ज्यामुळे उत्पादन कमी होऊन लक्षणीय आर्थिक नुकसान होऊ शकते. पुसा टोमॅटो हायब्रीड 6 (Tomato New Variety) विशेषत: चार प्रमुख रोगांना प्रतिरोधक आहे. हे चार रोग म्हणजे चुरडा मुरडा (Leaf Curl), उशिरा येणारा करपा (Late Blight Disease), फ्युजॅरियम मर रोग (Fusarium Wilt Disease), आणि जीवाणूजन्य मर रोग (Bacterial Wilt).
पुसा टोमॅटो हायब्रिड 6 ची लागवड करून, शेतकरी रासायनिक कीटकनाशके आणि बुरशीनाशकांची गरज लक्षणीयरीत्या कमी करू शकतात, ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊ होऊन, पर्यावरणावरील अनिष्ट परिणाम कमी करू शकतात. पिकाची रोगप्रतिकारक शक्ती त्यांना अधिक सुरक्षा प्रदान करते आणि वाढत्या हंगामात निरोगी रोपांची खात्री देते.
उच्च पौष्टिक मूल्य (High Nutritional Value)
पुसा टोमॅटो हायब्रिड 6 मध्ये उच्च पौष्टिक मूल्य आहे, ज्यामुळे आरोग्याबाबत जागरूक ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय आहे. या संकरित जातीच्या टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात म्हणजे29 मिग्रॅ प्रति 100 मिली रस एवढे आहे. व्हिटॅमिन सी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती राखण्यासाठी आवश्यक आहे, आणि या विविधतेमुळे या टोमॅटोला (Tomato New Variety) मागणी आणि विक्री वाढू शकते.
खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामासाठी योग्य
पुसा टोमॅटो हायब्रीड 6 या संकरित जातीची (Tomato New Variety) लागवड खरीप (पावसाळा) आणि रब्बी (हिवाळी) या दोन्ही हंगामात यशस्वीपणे केली जाऊ शकते. यामुळे शेतकरी वर्षभर या टोमॅटोची लागवड करून चांगला नफा कमवू शकतात.
परिपक्वता आणि फळांची वैशिष्ट्ये
- पुसा टोमॅटो हायब्रीड 6 झाडे लागवडीनंतर परिपक्व होण्यासाठी 130 ते 150 दिवस लागतात. हा मध्यम-ते-उशीरा- येणारा वाण आहे. यामुळे शेतकऱ्यांना मागणीनुसार फळांची काढणी करता येते, आणि मजुरांची उपलब्धता यांचे नियोजन सुद्धा करता येते.
- टोमॅटोची ही संकरीत जात हृदयाच्या आकाराची असून फळाचे वजन 80 ते 90 ग्रॅम असते. फळाचे साईझ आणि आकार यामुळे बाजारपेठेतील विक्रीसाठी याला योग्य असून, ग्राहकांना आकर्षक करतात.
- फळाच्या जाड सालीमुळे वाहतूक आणि साठवणुकी दरम्यान फळांची टिकवणक्षमता वाढते. जाड तव्चेमुळे टोमॅटो हाताळताना फळाचे नुकसान होत नाही, काढणीपश्चात नुकसान कमी होते, शेल्फ लाइफ वाढते जे व्यावसायिकदृष्टीने एक महत्त्वाचा घटक आहे.
- पुसा टोमॅटो हायब्रिड 6 चवीला उत्कृष्ट आहे, या टोमॅटोमध्ये मध्यम गोडपणा आणि संतुलित आंबटपणा आहे. एकूण विरघळणारे घन पदार्थ (TSS) चे प्रमाण 4.5° ब्रिक्स पेक्षा कमी आहे, तसेच 0.4% च्या आंबटपणामुळे याचा वापर खाण्यासाठी, सॉस आणि स्वयंपाकासाठी उपयुक्त आहे.
पुसा टोमॅटो हायब्रिड 6- उच्च उत्पादन देणारे वाण (High Production Tomato Variety)
पुसा टोमॅटो हायब्रीड 6 हे वाण (Tomato New Variety) खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात चांगले उत्पादन देते. खरीप हंगामात 900 क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन मिळते ज्यामुळे गुंतवणुकीवर भरीव परतावा मिळतो.
रब्बी हंगामात 600 क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन मिळते. ज्यामुळे हिवाळ्यातील लागवडीसाठी सुद्धा ही एक अत्यंत फायदेशीर जात आहे.
हे उत्पादन अनेक पारंपारिक जातींपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी जास्त कमाईची क्षमता मिळते.
प्रादेशिक अनुकूलता
छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये लागवडीसाठी पुसा टोमॅटो हायब्रीड 6 ची (Tomato New Variety) शिफारस केली जाते. वेगवेगळ्या हवामान परिस्थितीमुळे खरीप आणि रब्बी या दोन्ही ऋतूंमध्ये ही जात फायदेशीर ठरते.