हॅलो कृषी ऑनलाईन: काही महिन्यांपूर्वी हळदीच्या (Turmeric Market) भावात वाढलेली चमक आता घसरत चाललेली आहे. हिंगोली (Hingoli) येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात एप्रिल, मेमध्ये सरासरी 16 हजार रूपयांचा पल्ला गाठलेली हळद घसरली असून, काल 22 जुलै रोजी सरासरी केवळ 14 हजार 300 रूपयांपर्यंत भाव (Turmeric Rate) मिळाला. काल तीन हजार क्विंटल हळदीची आवक (Turmeric Market) झाली होती.
संत नामदेव मार्केट यार्डात (Sant Namdev Market Yard) एप्रिल, मे मध्ये सरासरी 16 हजार रूपयांचा पल्ला गाठलेली हळद घसरली असून, 22 जुलै रोजी सरासरी केवळ 14 हजार 300 रूपयांपर्यंत भाव मिळाला. या दिवशी तीन हजार क्विंटलची आवक (Turmeric Market) झाली होती.
मराठवाड्यासह विदर्भात हळद खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या हिंगोली येथील संत नामदेव मार्केट यार्डात (Turmeric Market) एप्रिल, मे महिन्यात हळदीला विक्रमी 18 ते 20 हजारापर्यंत भाव मिळाला आणि आवकही दररोज चार ते पाच हजार क्विंटल होत होती. जून उजाडताच मात्र भावात घसरण सुरू झाली. परिणामी, आवकही मंदावली. सोमवारी मात्र आवक वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. तब्बल तीन हजार क्विंटल हळद विक्रीसाठी आल्याने मार्केट यार्ड आवारात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
आवक वाढली मात्र भावात झालेली घसरण कायम असल्याने हळद उत्पादक शेतकरी (Turmeric Farmers) निराश झाले आहेत. किमान 13 हजार 100 ते कमाल 15 हजार 500 रुपया दरम्यान भाव मिळाला. तर सरासरी 14 हजार 300 रुपयांनी हळदीची विक्री झाली.
गत दोन महिन्यांपूर्वी हळदीला (Turmeric Market) सरासरी 16 हजार रूपयांचा भाव मिळत असताना आणखी भाव वाढतील, या आशेवर काही शेतकर्यांनी हळद विक्रीविना ठेवली; मात्र भाव वाढण्याऐवजी घसरल्याने त्या शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. काही शेतकरी अजूनही भाव वाढीची प्रतीक्षा करीत आहेत; परंतु सध्या तरी भाव वाढीची शक्यता कमीच असल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे.
मार्केट यार्डात (Turmeric Market) सोमवारी हळदीची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने मोजमापासाठी दोन दिवस लागणार आहेत. तसेच मार्केट यार्ड आवारातही वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे आज 23 जुलै रोजी दुपारी 1 वाजेपर्यंतच हळदीची आवक स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येणार आहे.
काय मिळाले मूग आणि सोयाबीनला भाव?
बाजार समितीच्या मोंढ्यात सोमवारी 11 क्विंटल मुगाची आवक झाली होती. या मुगाला (Moong Market Price) सरासरी 7 हजार 257 रूपयांचा भाव मिळाला. अलीकडच्या काळात खरीपात मुगाचा पेरा घटला आहे, तर उन्हाळी मुगाचा पेराही कमीच आहे. त्यामुळे मोंढ्यात आवक कमी होत असल्याचे चित्र आहे.
जवळपास आठ महिन्यांपासून सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) घसरण कायम आहे. किमान 6 हजाराचा भाव अपेक्षित असताना यंदा सोयाबीनने 5 हजाराचा पल्लाही गाठला नाही. परिणामी, शेतकर्यांना लागवडही वसूल झाला नाही. सोमवारी 600 क्विंटलची आवक झाली होती. सरासरी 4 हजार 245 भाव मिळाला.
मोंढ्यातील शेतमाल आवक आणि बाजारभाव
शेतमाल | आवक | भाव |
गहू | 300 | 2,365 |
ज्वारी | 61 | 2,000 |
मूग | 11 | 7,257 |
सोयाबीन | 600 | 4,245 |
हरभरा | 51 | 6,245 |
हळद | 3000 | 14,300 |