हॅलो कृषी ऑनलाईन: सध्याच्या वातावरणामध्ये हळदीवर (Turmeric Pest And Disease Management) कंदमाशी या किडीचा (Turmeric Pest) आणि पानावरील ठिपके, करपा व कंदकूज सारख्या रोगांचा (Turmeric Diseases) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज जि. सांगली येथील तज्ज्ञांनी यावेळी पिकाचे कसे नियोजन करावे याबाबत सल्ला (Turmeric Advisory) दिलेला आहे. तरी शेतकर्यांनी खालील प्रमाणे व्यवस्थापनाच्या (Turmeric Pest And Disease Management) उपाय योजना कराव्यात.
कंदमाशी (Turmeric Rhizome Fly)
- उघड्या पडलेल्या कंदाजवळ कंदमाशीची (Turmeric Pest And Disease Management) मादी अंडी घालते त्यामुळे हे कंद मातीने वेळोवेळी झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी.
- कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक 15 दिवसांच्या अंतराने क्विनॉलफॉस 25% प्रवाही- 400 मिली (20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा डायमिथोएट 30% प्रवाही- 300 मि. ली. (15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात) यापैकी एका कीटकनाशकाची प्रति एकर या प्रमाणे झाडावर आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करताना द्रावणात चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळावे.
- जमिनीतून क्लोरपायरीफॉस 50 टक्के 1 लिटर (50 मिलि प्रति 10 लिटर पाण्यात) घेऊन प्रति एकरी या प्रमाणात आळवणी करावी. याच पद्धतीने कीटकनाशकाची आळवणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात निश्चित करावी.
पानावरील ठिपके आणि करपा रोग (Turmeric Leaf Spot And Turmeric Anthracnose)
- करपाजन्य रोगग्रस्त पाने (Turmeric Pest And Disease Management) वेळोवेळी जमा करून जाळून नष्ट करावीत आणि शेतात स्वच्छता राखावी.
- प्रादुर्भाव कमी असल्यास कार्बेडेंझीम 50 टक्के – 400 ग्रॅम (20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा मॅन्कोझेब 75 टक्के – 500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड 50 टक्के – 500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी.
- प्रादुर्भाव जास्त असल्यास एजोक्सिस्ट्रोबीन 18.2 टक्के + डायफेनोकोनॅझोल 11.4 टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) – 200 मिली (10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा प्रोपीकोनॅझोल 25 टक्के – 200 मिली (10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा क्लोरथॅलोनील 75 टक्के – 500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी.
कंदकूज रोग (Turmeric Rhizome Rot)
- प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी 2 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा शेणखतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावे.
- जास्त पावसामुळे शेतात साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा वेळोवेळी निचरा करावा. जेणेकरून कंदकूज होण्यास कारणीभूत असलेल्या बुरशीचा प्रसार कमी करता येईल.
- कंदकूज (Turmeric Pest And Disease Management) झाली असल्यास जमिनीतून कार्बेडेंझीम 50% -200 ग्रॅम (10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा मॅन्कोझेब 75 टक्के -600 ग्रॅम (30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड 50 टक्के -1000 ग्रॅम (50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकरी या प्रमाणात दरवेळी महिन्यातून एकदा आळवणी करावी. (आळवणी करताना जमिनीमध्ये वापसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडा ताण द्यावा.)
महत्त्वाची सूचना:
- कुठलीही फवारणी करताना पावसाचा अंदाज घेऊनच फवारणी करावी. वरील कीटकनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते, सूक्ष्म मुलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये.
- लागोपाठ एकच एक कीटकनाशक फवारू नये आलटून पालटून वापरावे.
- फवारणी करता दूषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे आणि पाण्याचे प्रमाण शिफारसीतच वापरावे, कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.
- कीडनाशक फवारणी करताना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी.