हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सुरू झालेल्या ई पीक पाहणी प्रकल्पाअंतर्गत गाव नमुना नंबर ७/12 मध्ये शेतकऱ्यांना स्वतः ई पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे पिक पेरा यांची नोंदणी करता येणार आहे. या अँपवर गुरुवार दिनांक 26 पर्यंत राज्यातील दोन लाख 63 हजार 492 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी एस कच्छवे यांनी ही माहिती दिली. ई – पिक पाहणीसाठी स्मार्टफोन धारक शेतकऱ्यांनी प्ले स्टोर मधून ई -पीक ॲप डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. यामध्ये मध्ये शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास खातेदार शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांकावर चार अंकी विशिष्ट ओटीपी मिळतो. त्याद्वारे आत मध्ये पिक पेरा च्या नोंदणीची प्रक्रिया करता येते. ई पीक पाहणी अँप मध्ये खातेदार, शेतकऱ्यांचा परिचय, पिकांची नोंद, कायम पड नोंद, बांधावरची झाड नोंद, पिकांची छायाचित्र अपलोड, पीक माहिती आदी पर्याय आहेत. ॲप मध्ये नोंदणी साठी कृषी विभागाचे प्रशिक्षित कर्मचारी संबंधित गावातील शेतकऱ्यांना या हाताळणी पिक पेरा नोंदणी या अनुषंगाने प्रशिक्षण देत आहेत.
गुरुवार पर्यंत राज्यातील औरंगाबाद, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, कोकण या सहा महसूल विभागांतर्गत 35 जिल्ह्यांमधील 356 तालुक्यांमधील 63 हजार 946 गावांतर्गत एकूण 2 कोटी 54 लाख 85 हजार 424 सर्वे नंबर आहेत.. या सर्वे नंबर मधील सर्व शेतकरी खातेदारांनी ई पीक पाहणी अँप च्या द्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. आजवर एकूण दोन लाख 63 हजार 492 शेतकऱ्यांनी या ॲपवर नोंदणी केली आहे.