Tyre Crack : ‘या’ कारणांमुळे ट्रॅक्टरचे टायर लवकर खराब होतात? वाचा.. कशी काळजी घ्याल!

Tyre Crack How To Take Care
xr:d:DAF6N11hWmk:2214,j:6278441908096689621,t:24040614
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर (Tyre Crack) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच सध्या ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चलित साधनांचा वापर शेतीमध्ये अधिक प्रमाणात होत आहे. मात्र, शेतीमध्ये वापरली जाणारी ही यंत्रसामग्री महागडी असून, शेतकऱ्यांना एकदा ट्रॅक्टर घेतल्यानंतर त्याची खूप काळजी घ्यावी लागते. यातही ट्रॅक्टरच्या टायरची विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा शेतकऱ्यांना खराब टायरच्या (Tyre Crack) माध्यमातून शेतात काम करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

वापरादरम्यान होतो मनस्ताप (Tyre Crack How To Take Care)

ट्रॅक्टरच्या टायरकडे विशेष लक्ष न दिल्यास, वेळेआधीच शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरचे टायर खराब होऊन, शेतकऱ्यांना नवीन टायरची खरेदी करावी लागू शकते. याशिवाय टायर खराब झाल्यास, शेतकऱ्यांना शेतीमध्ये ट्रॅक्टर चालवताना मातीमध्ये पकड न बसण्याच्या प्रकाराला सामोरे जावे लागते. परिणामी, अनेकदा शेतकऱ्यांना टायर स्लिप मारून, जागीच फिरण्याची अडचण जाणवते. याच पार्श्वभूमीवर आज आपण ट्रॅक्टरच्या टायरला भेगा (Tyre Crack) का पडतात? भेगा पडल्या की सोल निघून टायर चोपडे होतात. त्यामुळे टायरला अशा भेगा पडू नये. यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे. याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

वातावरणाचा परिणाम

ट्रॅक्टरला कितीही चांगल्या क्‍वालिटीचे टायर टाकले तरीही त्यांची योग्य ती काळजी न घेतल्यास नुकसान होतेच. टायरला भेगा पडण्याचे सर्वात मोठे कारण हे वातावरण हे आहे. अति कडक ऊन किंवा नेहमीच ट्रॅक्टरसहित टायर उन्हात असणे. यामुळे टायरला भेगा पडायला सुरु होतात. ज्यामुळे कडक जमिनीत वापर करताना असे टायर सोल सोडतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी वातावणानुसार ट्रॅक्टरच्या तयारची काळजी घेतली पाहिजे.

साइड वॉल आणि हवा

ट्रॅक्टरच्या टायरला सर्वाधिक भेगा या साइड वॉलच्या बाजूने पडतात. त्यामुळे असे तयार रस्ते वाहतुकीदरम्यान अपघाताला आमंत्रण देऊ शकतात. तर नेहमीच टायरमध्ये कमी हवा असणे हे देखील टायरला भेगा पडण्याचे मोठे कारण आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांनी नियमित योग्य त्या प्रमाणात हवा ठेवली पाहिजे.

ट्रॅक्टरचा कमी उपयोग

ट्रॅक्टरच्या टायरला भेगा पडण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे ट्रॅक्टरचा वापर खूपच कमी असणे. कारण ट्रॅक्टर अनेक दिवस एकाच ठिकाणी उभा राहत असेल. तर स्थितीमध्ये टायरला दाबामुळे भेगा पडण्याचा धोका अधिक असतो. अशा शेतीत शेतकऱ्यांनी नियमित ट्रॅक्टर मागे पुढे घेऊन, टायरच्या स्थितीची जागा बदलणे आवश्यक असते.

काय आहे यावर उपाय?

जर तुमच्या ट्रॅक्टरच्या तयार भेगा पडल्या असतील तर त्यांना पूर्णपणे ठीक केले जाऊ शकत नाही. काही शेतकरी ट्रॅक्टरच्या टायरला भेगा पडल्यानंतर रिवाइंड करतात. मात्र, एकदा टायरला भेगा पडायला सुरुवात झाल्यानंतर, ही प्रक्रिया सुरूच राहते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन टायर टाकून आपल्या ट्रॅक्टरच्या टायरची योग्य ती काळजी घेणे हाच बेस्ट उपाय आहे.