Vegetable Prices: वर्षभरात भाजीपाल्याच्या किंमतीत 81 टक्क्यांपर्यंत वाढ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: भाजीपाल्याच्या किमतीत (Vegetable Prices) दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे.

गेल्या वर्षभरात अन्न धान्याच्या महागाईत कोणतीही घट झालेली नाही. वेगवेगळ्या भाजीपाल्याच्या किमतीत (Vegetable Prices) जसे बटाटा, कांदा आणि टोमॅटोच्या किंमतीत 81 टक्क्यांपर्यंत वाढ झालेली आहे. गेल्या 15 दिवसात कांद्याच्या घाऊक भावात सुद्धा 50 टक्क्यांपर्यंत वाढ झालेली आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या (Ministry of Consumer Affairs) वेबसाइटनुसार, गेल्या वर्षभरात बटाट्याची सरासरी किंमत (Vegetable Prices) 62 टक्क्यांनी वाढली आहे. 30 एप्रिल 2023 रोजी बटाट्याची किंमत (Potato Price) 18.88 रुपये प्रति किलो होती जी 10 जून 2024 पर्यंत 30.57 रुपये प्रति किलो झाली आहे.

कांद्याची किंमत (Onion Rate) 66 टक्क्यांनी वाढली आहे. 30 एप्रिल 2023 रोजी कांद्याची किंमत 20.41 रुपये प्रति किलो होती जी 10 जून 2024 रोजी 33.98 रुपये प्रति किलो झाली आहे.

टोमॅटोच्या किंमतीत 81 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 30 एप्रिल 2023 रोजी टोमॅटोची किंमत (Tomato Price) 20.55 रुपये प्रति किलो होती जी 10 जून 2024 रोजी 37.11 रुपये प्रति किलो झाली आहे.

ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर या भाज्यांच्या (Online Vegetable Platform) किंमती आणखी जास्त आहेत. 30 रुपये प्रति किलो बटाटा ऑनलाइन 41 रुपये प्रति किलो आणि कांदा 43 ते 47 रुपये प्रति किलो पर्यंत विकला जातोय.

या सर्वाचा परिणाम म्हणजे भाजीपाल्याच्या वाढत्या किंमतीमुळे (Vegetable Prices) सर्वसामान्यांवर बोजा वाढला आहे. व्हेज थाळी महाग झाल्याने लोकांना आहारात बदल करावा लागत आहे.

ही परिस्थिती बघता सरकारने तातडीने या समस्येवर उपाय योजना करणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांना (Farmers) योग्य भाव मिळेल याची खात्री करणे आवश्यक आहे, त्याबरोबरच महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी पावले उचलणे गरजेचे आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.