हॅलो कृषी ऑनलाईन: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला किमतीत (Vegetable Rate) घसरण बघायला मिळत आहे. सध्या बाजारात भाजीपाल्याची (Vegetable Market) वाढलेली आवक आणि ग्राहकांनी खरेदी कमी केल्याने अनेक भाज्यांच्या किंमतीत घट झाली आहे. फरसबी, शेवगा, वाटाणा, कोथिंबीर यासह अनेक पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत. मात्र, टोमॅटोच्या किंमतीत (Tomato Price) मात्र वाढ बघायला मिळत आहे.
आवक वाढली, खरेदी कमी झाली
शुक्रवार 19 जुलैला 628 ट्रक आणि टेम्पोमधून 2914 टन भाजीपाला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Mumbai Krushi Utpanna Bazar Samiti) आला. यामध्ये 5 लाख 39 हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश होता. सततच्या पावसामुळे आणि वाढलेल्या भाजीपाला किंमतीमुळे ग्राहकांनी (Customers) खरेदी कमी केली आहे. यामुळे बाजारात मागणी कमी झाली आणि भाज्यांचे दर (Vegetable Rate) कमी होऊ लागले आहेत.
भाज्यांच्या किंमतीत घट (Vegetable Rate)
मुळा: 80 ते 90 रुपये प्रति किलो असणारा मुळा आता 30 ते 40 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.
वाटाणा: 160 ते 200 रुपये प्रति किलो असणारा वाटाणा 70 ते 90 रुपये प्रति किलो
फरसबी (Farsabi): 80 ते 90 रुपये प्रति किलो असणारी फरसबी आता 50 ते 56 रुपये प्रति किलो
शेवगा: 70 ते 90 रुपये प्रति किलो असणारा शेवगा आता 60 ते 80 रुपये प्रति किलो
कोथिंबीर: 25 ते 30 रुपये प्रति गुच्छा असणारी कोथिंबीर आता 20 ते 25 रुपये प्रति गुच्छा
टोमॅटोच्या किमतीत वाढ
एक आठवड्यापूर्वी 20 ते 42 रुपये प्रति किलो दराने विकला जाणारा टोमॅटो आता 60 ते 70 रुपये प्रति किलो झाला आहे आणि किरकोळ बाजारात तो 120 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.
पावसामुळे भाजीपाला खराब
सातत्याने होणाऱ्या पावसामुळे भाजीपाला खराब (Vegetable Damage Due To Rain) होण्याचे प्रमाण वाढले आहे. बाजार समितीत आणि किरकोळ बाजारातही खराब भाज्यांचे प्रमाण वाढत आहे.