हॅलो कृषी ऑनलाईन : ज्या शेतकऱ्यांकडे शेतातील कृषी पंपाचे वीज बिल थकीत आहे . अशा शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडणी ही महावितरण कडून तोडली जात आहे . त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील गहू , हरबरा कांदा सह अन्य पिकांना फटका बसत आहे . त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणी थांबण्यात यावी यासाठी यासाठी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील एका उंच टॉवरवर चढून महावितरण व राज्य सरकार विरोधात वीरुगिरी आंदोलन सुरू केले आहे .
राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे अशी मागणी देखील या आंदोलकांनी केली आहे . दरम्यान मागणी पूर्ण न झाल्यास आत्महत्येचा इशारा ही आंदोलकांनी दिला आहे . दरम्यान सध्या घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहे . तर आंदोलन कर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत