राज्यात हवामानाची आंधळी कोशिंबीर; कोकणात पाऊस तर विदर्भात उष्णतेची लाट

rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 31 मे रोजी नैऋत्य मान्सून वारे म्हणजे मान्सूनचे आगमन केरळात होणार आहे. त्यानंतर दहा-बारा दिवसानंतर महाराष्ट्रात मान्सून बरसणार आहे. मात्र सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उन्हाळा तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाळा अशी हवामानाची आंधळी कोशिंबीर सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘या’ जिल्ह्यात पाऊस

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवसात राज्यात पावसाची स्थिती असणार आहे. तर राजस्थान सह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटा सहन कराव्या लागणार आहेत. येत्या पाच दिवसात पुण्यात, कोल्हापूर, सांगली, सातारा, संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर सध्या दक्षिण कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पूर्व मोसमी पावसाला सुरुवात झाली आहे.

तर विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याशिवाय 29 आणि 30 मे रोजी पूर्व राजस्थान व दक्षिण पंजाब, दक्षिण हरियाणा आणि विदर्भात उष्णतेची तीव्रता जाणवणार आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या शेवटी पुन्हा विदर्भ करांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.