हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) : महाराष्ट्रात मागील मार्च महिन्यांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. विदर्भ आणि मराठवाड्याची पाठ सोडायचं नाव काही घेत नाही. पिकांची हानी झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. तसेच हवामान खात्याने (IMD Pune) आज अपडेट केलेली माहिती हवामान तज्ञ (Meteorologist) के. एस. होसलकर यांनी ट्विट करत आजच्या हवामानाबद्दल माहिती दिली आहे. ती पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.
राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाला पोषक असं वातावरण झाल्याचं ट्विट करत के. एस. होसलकरांनी (K.S. Hosalkar) माहिती दिली आहे. आज (ता. ७) या दिवशी मराठवाड्यातील लातूर, नांदेड, उस्मानाबाद येथे पावसाची अधिक शक्यता पहायला मिळत आहे. तसेच मुंबई, नाशिक, धुळे, नंदुरबार येथे ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे”, असे के. एस. होसलकर यांनी ट्वीट (Tweet) करत माहिती दिली. तसेच रोजच्या तापमानात बदल होतो. हे तापमान शेतकऱ्यांच्या शेतीसाठी किती पोषक आहे. यासाठी शेतकऱ्यांना रोजच्या तापमानाबद्दल तसेच हवामानाबद्दल अपडेट मिळवण्यासाठी ॲपद्वारे माहिती मिळवू शकता. (Weather Update)
७ एप्रिल, ७.३० am.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 7, 2023
जिल्हे नांदेड, लातूर, उस्मानाबाद … TSRA🌩🌩
मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुढच्या २,३ तासात.
– IMD
मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार ढगा़ळ आकाश .. pic.twitter.com/YTXNAQSwiT

रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
तुमच्या गावात पाऊस पडणार काय?
मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज आणि मुंबई, नाशिक, धुळे, नंदुरबार येथे ढगाळ वातावरणाची कारणे पुढीलप्रमाणे :
कर्नाटकाच्या उत्तर परिसरातून १.५ मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत होते. उत्तर अंतर्गत कर्नाटक ते दक्षिण दक्षिण तामिळनाडू समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर खंडित वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. दक्षिण राजस्थान आणि परिसरावर सपाटीपासून ३.१ किमीवर चक्राकार वारे वाहत आहेत असल्याने आज मराठवाड्यातील काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे.