Weather Update Maharashtra:  हवामान विभागातर्फे राज्यात उद्यापासून दोन दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज; या जिल्ह्यात बरसणार सरी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात या आठवड्यात थंडीची सुरुवात (Weather Update Maharashtra) झालेली आहे. बहुतेक जिल्ह्यात तापमान कमी होत असताना दिसत आहे. त्यातच हवामान विभागाने (IMD) 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी राज्यात काही जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस बरसणार (Rainfall Alert) अशी शक्यता आहे अंदाज दिलेला आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे (Weather Update Maharashtra).

आज 13 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्हा आणि घाट भाग, आणि सांगली जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे.

सध्या राज्यातील वातावरण कोरडे असले तरी उद्या 14  आणि 15 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्हा आणि घाट भाग, सातारा जिल्हा आणि घाट भाग, सांगली जिल्ह्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस (Unseasonal Rainfall)पडण्याची शक्यता आहे. या भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे (Weather Update Maharashtra).

पुणे आणि आसपासच्या परिसरात 16 नोव्हेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.  

गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील लातूर व धाराशिव जिल्हयात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

राज्यात 17 नोव्हेंबर पर्यंत अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून वातावरण 33 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे.

एकंदरीत नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात मिश्र स्वरूपाचे हवामान असणार असा अंदाज आहे. ला निना आणि चक्रीवादळामुळे दिवस उष्ण आणि रात्र थंड असणार आहे (Weather Update Maharashtra).

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.