सोयाबीनसह 8 शेतीमालाच्या वायद्यांवरही निर्बंध, वायदा बंद म्हणजे नेमके काय? काय होणार दरावर परिणाम?

Soyabean Rate Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात केंद्र सरकारने सोयाबीन सह इतर महत्वाच्या पिकांचे वायदे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सोयाबीच्या बाबतीत बोलायचे झाले तर सोयाबीनचे दर हे स्थिर होते. मात्र मागील दोन तीन दिवसांपासून हे दर सतत घसरत आहेत. त्यातच वायदे बंद चा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकरी काय भूमिका घेणार त्यावरच सोयाबीन या मुख्य पिकाचे दर अवलंबून राहणार आहेत.

वायदे बंद म्हणजे नेमके काय होणार?

शेतीमालाच्या विक्री ही वायद्यानुसार म्हणजेच दर ठरविले जात होते पण पैसे अदा करण्यासाठी व्यापारी, आडते यांना मोकळीक होती. त्यासाठी आवधी मिळत होता अन् शेतकऱ्यांना चांगला दरही. त्यामुळे साठा करणारे व्यापारी आणि प्रक्रिया उद्योदक हे मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करीत होते. पण आता यावरच बंदी असल्याने त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थार्जानावर होणार आहे. यापूर्वी वायद्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनचे भविष्यात काय दर राहणार याचा अंदाज बांधता येत होता. त्यामुळे काही दिवस तरी या निर्णयाचा परिणाम थेट होणार आहे.

या शेतमीलाचा समावेश

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार –सोयाबीन–सोयातेल–सोयापेंड–सोयाडेस्क कच्चे पामतेल–मूग–गहू–बासमती वगळून इतर भात–मोहरी–मोहरी तेल–हरभरा.
या शेतीमालाचा आता वायदा होणार नाही. यामधील हरभरा, मोहरी आणि मोहरी तेल या शेतीमालावर यापूर्वीच वायदेबंदी घालण्यात आली आहे. यामधील गव्हाचे फारसे व्यवहार हे थेट शेतकऱ्यांशी संबंधित नसतात मात्र, सोयाबीन, मूग, हरभरा, मोहरीच्या दरावर होणारा परिणाम थेट शेतकऱ्यांशी संबंधित असणार आहे.