Sunflower Variety : सुर्यफुलाचा तेल काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्यामुळे जगातील तेलबिया (Oilseeds) पिकांमध्ये सुर्यफुलाचा तिसरा क्रमांक लागतो. एकूण तेलबिया क्षेत्रांपैकी सुर्यफुलाने २८ टक्के क्षेत्र व्यापले आहे. सुर्यफुलाचे उत्पादन महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर,विदर्भातील बुलढाणा,अमरावती या जिल्ह्यात घेतले जाते. महाराष्ट्रामध्ये सरासरी सुर्यफुलाची उत्पादक क्षमता ७२७ किलो हेक्टर प्रति आहे. सूर्यफूल हे खरीप, रब्बी व उन्हाळी या तिन्ही हंगामात (season) घेता येते. त आता जाणून घेऊया सुर्यफुलाच्या सुधारित वाणाविषय.
खात्रीशीर अन जातीवंत रोपे कशी विकत घ्यावीत?
शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा एखादं पीक घेतो तेव्हा त्यावर कित्तेक महिने मेहनत घेतो. पण ज्याचं पीक आपण लावलंय ते रोप चांगल्या क्वालिटीचं आहे का हे आपण अनेकदा पाहत नाही. बियाणे किंवा रोपं विकत घेताना आपण एक दोन रोपवाटिकांमध्येच चौकशी करतो. शेतातल्या कामातून आपल्याला अनेकदा त्यासाठी वेळहि मिळत नाही. पण जर तुम्हाला कमी किंमतीत खात्रीशीर अन जातिवंत रोपे विकत घ्यायची असतील तर Hello Krushi हे मोबाईल अँप बेस्ट आहे. कारण या अँपवर तुम्हाला तुमच्या गावाच्या जवळील सर्व रोपवाटिकांसोबत संपर्क करण्याची सुविधा आहे. तुम्ही एका क्लिकवरून महाराष्टरातील कोणत्याही रोपवाटिका मालकाशी संपर्क करून सदर रोपवाटिकेत तुम्हाला हवी ती रोपे आहेत का हे चेक करू शकता. तसेच योग्य किमतीत रोप विकत घेऊ शकता. अनेक रोपवाटिका शेतकऱ्यांना फ्री होम डिलिव्हरीसुद्धा देतात. तेव्हा आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर ओपन करा आणि Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या.
सुर्यफुलाचे सुधारित वाण आणि त्यांची वैशिष्ट्ये (Sunflower Variety)-
१) मॉडर्न वाण
- या वाणापासून हेक्टरी जवळपास ८०० ते पंधराशे क्विंटल उत्पादन मिळते.
- कालावधी हा 80 ते 85 दिवसाचा (Day) आहे.
- या वाणामध्ये ३४ ते ३५ टक्क्यांपर्यंत तेलाचे प्रमाण आहे.
- हे वाण बुकटे असून लवकर येणारे आहे.
२) एस.एस.56 वाण
- यापासून अडीच एकरामध्ये म्हणजेच हेक्टरी आठशे ते चौदाशे क्विंटल उत्पादन मिळते.
- याचा कालावधी (Duration) 82 ते88 दिवसाचा आहे.
- या वाणामध्ये 34 ते 36 टक्के तेलाचे प्रमाण आहे.
- संपूर्ण महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस
- लवकर येणारी जात आहे.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
३) टी.एन.ए.यु.एस.यु.एफ.-7
- यापासून हेक्टरी 1000 ते 1700 क्विंटलउत्पादनमिळते.
- याचा कालावधी हा 85 ते 90 दिवसांचा आहे.
- यामध्ये 38 ते 41 टक्क्यांपर्यंत तेलाचे (Oil) प्रमाण आहे.
- ही देखील लवकर येणारी जात आहे.
४) डी.आर.एस.एफ.108
- यापासून हेक्टरी (Hectares) 900 ते 1800 क्विंटल उत्पादनमिळते.
- याचा कालावधी हा 95 ते 100 दिवसांचा आहे.
- यामध्ये 36 ते 39 टक्क्यांपर्यंत तेलाचे प्रमाण आहे.
- यामध्ये जास्त तेलाचे प्रमाण आहे
५) एल.एस.एफ.-8
- यापासून हेक्टरी 1000 ते चौदाशे क्विंटल उत्पादन मिळते.
- याचा कालावधी 90 ते 95 दिवसाचा आहे.
- यामध्ये 36 ते 39 टक्के तेलाचे प्रमाण आहे.
- सर्व महाराष्ट्राभर लागवडीसाठी (planting) उपयुक्त
- केवडा, ठिपके व तांबेरा रोगांसाठी प्रतिकारक आहे.