कधी संपणार शेतकरी आत्महत्येचं सत्र ? एकट्या अमरावती जिल्ह्यात गेल्यावर्षी 361 आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अतिवृष्टी, नापिकी , मालाला नसलेला भाव, कर्जबाजारीपणा यामुळे राज्यात शेतकरी आत्महत्येची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. एकट्या अमरावती जिल्ह्याचा विचार करता अमरावती जिल्ह्यात २०२१ या सालात ३६१ आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. जाहीर झालेल्या यादीतून ३६१ पैकी२२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या यादीमधून ७५ आत्महत्या अपात्र आहेत. ६० शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. २०२१ या सालात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ऑगस्ट महिन्यात झाल्या आहेत. शिवाय २०२२ च्या पहिल्या महिन्यातच जानेवारीत तब्बल २२ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे . ह्या २२ ही आत्महत्यांची चौकशी प्रलंबित आहे. ही आकडेवारी पाहून शेतकऱ्यांच्या मागे लागलेलं आत्महत्येचं ग्रहण कधी संपणार असा एकच सवाल मागे उरतो …

काय आहेत आत्महत्येची करणे

शेतकरी आत्महत्येच्या प्रमुख कारणांमध्ये कर्जबाजारीपणा , आजारपण, बेरोजगारी, आणि इतर घरघुती कारणावरून आत्महत्या झाल्याचे समजते आहे. विशेष म्हणजे मागील वर्षात ३६१ आत्महत्यांपैकी अनेक आत्महत्या झाल्या नसल्याचा पोलिसांनी संशय आहे. तसेच काही आत्महत्यांची चौकशी सुरू आहे.

काय आहे आकडेवारी ?

–अमरावती जिल्ह्यात एकूण ३६१ शेतकऱ्यांची आत्महत्या
–२२६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या पोलिसांनी चौकशीअंती पात्र
— ७५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या अपात्र ठरल्या आहेत.
–६० शेतकऱ्यांच्या आत्महत्येची चौकशी अद्याप पोलिसांकडून प्रलंबित
— २०२२ च्या पहिल्या महिन्यातच जानेवारीत तब्बल २२ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे . ह्या २२ ही आत्महत्यांची चौकशी प्रलंबित आहे.

संदर्भ : टीव्ही ९