वाह क्या बात…! सांगोल्यात दोन कोटींचे राज्यातील दुसरे मोठे शीतगृह, शेतमाल राहणार फ्रेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात राज्यातील दुसरं मोठं शीतगृह उभारण्यात आले आहे. नाशवंत मालाकरिता मागील अनेक दिवसांपासून मागणी होत होती. अखेर ही मागणी मान्य होत सांगोल्यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सांगोला येथे तब्बल दोन कोटी रुपयांचे आणि 840 मेट्रिक टन क्षमतेचे शीतगृह उभारण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी हे उपलब्ध करण्यात आले आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत केंद्र शासनाने 75 टक्के तर वखार महामंडाळाने 25 टक्के असा 2 कोटींचा निधी प्राप्त झाला होता. यामधून या शीतगृहाची उभारणी करण्यात आली आहे. सांगोला तालुक्यात डाळिंब उत्पादक आहेत मात्र, त्यांच्या मालाच्या साठवणुकासाठी योग्य साधन असे नव्हते. त्यामुळे सन 2010 साली वखार महामंडळाने येथील शेतकऱ्यांसाठी शीतगृह देण्याचे मान्य केले होते. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून सांगोलाकरांची ही मागणी प्रलंबित होती. अखेर शीतगृह तर उभारण्यात आले आहे शिवाय, 1800 मेट्रिक टन क्षमतेचे गोडावून उभारण्यासाठी येथील कृषी उत्पन्न समितीने 20 गुंठे जागा ही 30 भाडेतत्वावर दिली आहे. त्यामुळे डाळिंब साठवणुकीचाही प्रश्न मार्गी लागणार आहे. डाळिंबाबरोबरच इतर शेती माल ठेवण्यासाठी या वखाराचा उपयोग शेतकऱ्यांना होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

राज्यातील दुसरे मोठे शीतगृह

–उत्पादनाबरोबरच शेती मालाची साठवणूकही महत्वाचा मुद्दा आहे.
–सांगोला सारख्या दुर्गम भागात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरीन हे डाळिंबाचे उत्पादन घेतात.
–मात्र, नाशवंत माल ठेवण्यास योग्य जागा नसल्याने त्यांचे उत्पादन हे घटत होते.
–आता राज्यातील दुसरे तर पुणे विभागातील पहिले शीतगृह उभारण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
–840 मेट्रीक टनाचे हे शीतगृह असून यामध्ये तीन वेगवेगळे भाग आहेत.
–याचे तापमान हे 0 अंश ते 4 डीग्री सेल्सिअस असणार आहे.
–ज्यामुळे नाशवंत माल हा टिकून राहणार आहे. 24 तास विजपुरवठा, जनरेटर, किटक नियंत्रित तसेच 24 तास सुरक्षा व्यवस्थेत हे शीतगृह राहणार आहे.