Climate Resilient Crops: ‘ही’ आहेत कोणत्याही वातावरणात वाढू शकणारी हवामान प्रतिरोधक पिके!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: दुष्काळ, उष्णतेच्या लाटा आणि पूर (Climate Resilient Crops) यासारख्या नैसर्गिक घटकांचा राष्ट्रीय अन्नसुरक्षेवर परिणाम होतो. विशेषत: लहान शेतकर्‍यांना यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागते. अशावेळी हवामानास अनुकूल पिके जी नैसर्गिक आपत्तिला (Natural Calamities) सुद्धा तोंड देऊ शकतील अशा पिकांची निवड करणे हे अन्नसुरक्षा आणि शाश्वत शेतीची दृष्टीने गरजेचे आहे. आजच्या लेखात जाणून घेऊ या विविध परिस्थितीशी जुळवून घेणारी दहा वेगवेगळी पिके (Climate Resilient Crops) जी हवामान-प्रतिरोधक सुद्धा आहेत.

हवामान प्रतिरोधक पिके (Climate Resilient Crops)

हवामान बदलाच्या परिणामांशी जुळवून घेण्यासाठी हवामानास अनुकूल पिके निवडणे हे एक आवश्यक धोरण आहे. ही पिके पाण्याची वाढीव कार्यक्षमता, पोषक तत्वांची समृद्धता आणि जमिनीची सुधारणा यासह अनेक फायदे देतात, ज्यामुळे त्यांना शाश्वत शेतीसाठी मौल्यवान समजले जाते.

  • ज्वारी (Sorghum)

दुष्काळी प्रतिकारशक्ती आणि अनुकूलतेसाठी ज्वारी हे महत्त्वाचे पीक आहे (Climate Resilient Crops). खोल मुळे यामुळे दुष्काळी भागातही या पिकांची वाढ चांगली होते. प्रथिने, फायबर आणि खनिजे युक्त हे ग्लूटेन-मुक्त धान्य पचनासंबंधी आजार असणार्‍यांसाठी योग्य आहार आहे. याचा वापर धान्य, पशुआहार तसेच जैवइंधनामध्ये केला जातो. भरपूर सूर्यप्रकाश वातावरणात आणि पाण्याचा चांगला निचरा होणा-या विविध प्रकारच्या मातीत हे पीक चांगले येते.

  • बाजरी (Pearl Millet)

हे पीक अत्यंत प्रतिकूल हवामान आणि जमिनीत (Climate Resilient Crops) सुद्धा घेता येते. हे धान्य प्रथिने, फायबर आणि खनिजांनी समृद्ध आहेत आणि त्यांचा कमी ग्लायसेमिक निर्देशांक यामुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण करण्यास मदत करते. कमी कालावधीत येणारे पीक असल्यामुळे वर्षभरात जास्त वेळी येते. कमीतकमी सिंचन, चांगली निचरा होणार्‍या वालुकामय चिकणमातीमध्ये हे पीक वाढतात.

  • रताळे (Sweet Potato)

व्हिटॅमिन ए आणि सी, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध रताळे हे कंदफळ रोगप्रतिकारक आणि आरोग्य आणि पचनासाठी चांगले आहे. दुष्काळ सहन करणारे हे पीक विविध प्रकारच्या मातीत आणि हवामानात चांगले वाढतात (Climate Resilient Crops). उबदार तापमान, चांगल्या निचर्‍याची वालुकामय जमिनीत लागवड करता येते. चांगल्या उत्पादनासाठी या पि‍काला नियमित पाणी द्यावे.

  • राजगिरा (Amaranth)

खाण्यायोग्य पाने आणि बिया यामुळे राजगिरा एक पौष्टिक वनस्पती आहे. उष्ण तापमान आणि  आणि दुष्काळी परिस्थितीत हे पीक घेता येते. बिया प्रथिनांचा चांगला स्रोत असून पाने जीवनसत्त्वे आणि खनिजे यांनी समृध्द असतात. हे पीक खराब मातीतही चांगले वाढते. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आणि भरपूर सूर्यप्रकाश या पिकासाठी योग्य आहे.

  • क्विनोआ (Quinoa)

क्विनोआ हे एक सुपरफूड आहे, ज्यामध्ये प्रथिने, फायबर आणि आवश्यक खनिजे जास्त आहेत. क्विनोआ हे  दुष्काळ ते ओल्या उष्णकटिबंधीय प्रदेशांसह विविध परिस्थितीमध्ये वाढू शकते. चांगला निचरा होणारी, वालुकामय चिकणमाती आणि भरपूर सूर्यप्रकाश या पिकासाठी चांगले असते.  देते.

  • चवळी (Cow Pea)

चवळी हे दुष्काळ-प्रतिरोधक पीक आहे जे उष्ण, कोरड्या हवामानास अनुकूल आहे (Climate Resilient Crops). हे पीक जमिनीत नत्राचे स्थिरीकरण करून मातीची सुपीकता वाढवते. चवळी पि‍काला भरपूर सूर्यप्रकाश आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन चांगली मानवते. कमीतकमी सिंचनामध्ये सुद्धा हे पीक चांगले येते. दुष्काळी प्रदेशात शाश्वत शेतीसाठी हे उत्कृष्ट पीक आहे.

  • अळू (Taro)

अळू हे ओल्या आणि कोरड्या अशा दोन्ही परिस्थितीत वाढते. ज्यामुळे पाणी साचलेल्या जमिनीतही हे पीक घेता येते. हे पीक कार्बोहायड्रेट्स, फायबर, आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे यांनी समृद्ध आहे. हे पीक ओलसर, चांगला निचरा होणारी माती आणि उबदार हवामान पसंत करते. चांगली वाढ होण्यासाठी नियमित सिंचनाची गरज असते.

  • कॅक्टस (Cacti/Cactus)

कॅक्टस ही वनस्पती अत्यंत कोरड्या परिस्थितीत येते. रखरखीत वाळवंटात सुद्धा हे पीक घेता येते (Climate Resilient Crops). कॅक्टीचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यांच्या ऊतींमध्ये पाणी साठवण्याची क्षमता, ज्यामुळे त्यांना दुष्काळाच्या कालावधीत सुद्धा टिकून राहता येते.

काही जाती, जीवनसत्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि आहारातील फायबरने समृद्ध असलेली खाद्य फळे तयार करतात, जे पौष्टिक आहेत. कमी देखभाल खराब मातीच्या परिस्थितीत हे पीक वाढण्यास सक्षम असतात. चांगल्या लागवडीसाठी कॅक्टीला चांगली निचरा होणारी माती आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक आहे. पाणी साचू नये म्हणून ते सामान्यत: कुंडीत किंवा गादी वाफे यावर उगवले जातात.  

  • क्लोव्हर/रानमेथी (Clover)

क्लोव्हर हे जमिनीत नत्राचे स्थिरीकरण करून मातीचे आरोग्य सुधारते. विविध परिस्थितींशी जुळवून घेणारे हे पीक चारापिक, कव्हर पीक आणि हिरवळीचे खत म्हणून वापरले जाते. क्लोव्हर हे दुष्काळ-सहिष्णु पीक (Climate Resilient Crops) पाण्याचा निचरा होणा-या जमिनीत वाढते. नियमित पेरणी केल्याने चारा पीक म्हणून वापरता येते. हे सिंथेटिक रासायनिक खतावरील अवलंबन कमी करते.  

  • हरभरा/चना (Chickpeas)

चना किंवा गार्बॅन्झो बीन्स, कोरड्या हवामानात आणि पोषक नसलेल्या मातीत वाढतात (Climate Resilient Crops). ते प्रथिने, फायबर आणि आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. हे पीक नत्र स्थिरीकरणाद्वारे जमिनीची सुपीकता सुधारतात. उत्तम निचरा होणारी माती आणि भरपूर सूर्यप्रकाश या पिकाला मानवते. वाढत्या हंगामात मध्यम सिंचनाची गरज असते.