आंतरराष्ट्रीय बाजरात सोयाबीनच्या दरात तेजी ; उत्पादनात घट आणि मागणीत वाढ

soyabean
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये मंगळवारच्या सोयाबीन दरात थोड़ी वाढ दिसून आली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजरात मात्र सोयाबीनच्या दरात तेजी दिसून येते आहे. चीन या जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या देशाला सोयाबीनची मोठी गरज भासते. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझील, अर्जेंटिना, पेरुग्वे ,उरुग्वे, अमेरिका हे देश सोयाबीनचे चांगले उत्पादन घेतात. शिवाय या देशांमधून सोयाबीनची निर्यातही मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र ब्राझील, अर्जेंटिना, पेरुग्वे ,उरुग्वे या देशांमध्ये सोयाबीनचे उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. त्यामुळे भविष्यातील परिस्थितीचा अंदाज घेऊन अनेक मोठ्या कंपन्या सोयाबीन मध्ये पैसे गुंतवत आहेत. स्पेक्युलेटर्सही बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याचं जाणकारांचं मत आहे. तसेच चीनची सोयाबीन खरेदी ही सुरूच आहे. त्यामुळे शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड अर्थात सीबॉटवर सोयाबीन दर तेजीत आहेत. मंगळवारी मार्च चे वायदे 1584 सेंट प्रति बुशेल्सवर पोहोचले होते.

‘या’ देशातील उत्पादन घटीचा फायदा अमेरिकेला
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार करिता ब्राझील अर्जेंटिना पेरू गवे आणि उरुग्वे या देशांमध्ये उशिरा आणि दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे या देशातील सोयाबीन उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अर्जेंटिना आणि ब्राझील मध्ये तर दर आठवड्याला उत्पादनातील घटीचा अंदाज व्यक्त होतो आहे. ब्राझील मधील सोयाबीन उत्पादनाचा सरकारी अंदाज 1300 लाख टनांवर ही येऊ शकतो अशी शक्यता येथील काही कमोडीटी एक्सपर्ट्स ने व्यक्त केली आहे. ब्राझील मधील एकूण सोयाबीन उत्पादनापैकी तब्बल 18 टक्के उत्पादन रियो ग्रांदे डो सुल ज्या एका राज्यात होते. परंतु या राज्यातील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे मागील महिन्यातील अहवालात युएसडीए नेम ब्राझीलमध्ये 1350 लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता तर येथील संस्थांनी 1280 ते 1330 लाख टनांपर्यंत उत्पादनाचे अंदाज जाहीर केले आहेत. महत्त्वाच्या उत्पादक देशांमधील घटीचा अंदाजामुळे चिनला आता अमेरिकेकडे वळावे लागत आहे. भविष्यात ब्राझील आणि अर्जेंटिना या देशात सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाल्यास दर वाढतील या अपेक्षेने अमेरिकेचा सोयाबीन बाजार तेजीत आहे. स्पेक्युलटर सक्रिय झाले असून सोयाबीन खरेदी करत आहेत तसेच सीबॉटवरील वायदा मध्ये देखील खरेदीतही वाढ झाली आहे.

चीनमध्ये सोयाबीनला मोठी मागणी

–चीनची सोयाबीनची मागणी मोठी आहेत
— यंदा चीनमध्येही उत्पादनात घट झाली आहे.
–चीनला सोया पेंड आणि सोयाबीन तेलाची मोठी आवश्यकता असते.
— भविष्यातील उत्पादन घट लक्षात घेऊन चीनने आतापासूनच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची खरेदी सुरू केली आहे
–या सर्व परिस्थितीमुळे अमेरिकेत सोयाबीन खरेदी अनेक कंपन्या निधी टाक