हॅलो कृषी ऑनलाईन : वाळवा तालुक्यातल्या उत्तरेकडील भागात दूषित चारा आणि पाण्यामुळे गाई-म्हशी मध्ये मोठ्या प्रमाणात जीवघेण्या डायरीयाची साथ लाभली आहे. खाजगी पशुतज्ज्ञांच्या कडून शेतकरी जनावरांच्या वर उपचार करून त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र पशुसंवर्धन विभागाने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.
डायरिया च्या साथीमुळे जनावरांचे शेण पाण्यासारखा पातळ होते. शरीरातील ग्लुकोज ची मात्रा कमी होऊन जनावरांना ग्लानी होण्याचे प्रकार घडत आहेत अति मलमूत्र विसर्जन झाल्यानंतर तून रक्त पडण्याचे प्रकार वाढल्याने जनावरांच्या जीवितास धोका आहे एकीकडे दुधाला दर नाही आणि त्यात खर्चीक उपचारांवर शेतकरी हतबल असल्याचे दिसून येत आहे.
दवाखाण्याची कमतरता
जिल्हा परिषदेच्या अंतर्गत श्रेणी-1 असे रेठरेहरणाक्ष ,भवानी नगर येथे तसंच राज्य शासनाच्या श्रेणी-2 अंतर्गत येडेमच्छिंद्र येथे पशुधन दवाखाने आहेत. सेवेचा लाभ फक्त स्थानिक गावांना होतो. घटसर्प लाळ्या खुरकूत लसीकरण याच्या व्यतिरिक्त वर्षभर दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पशुपालकांना जनावरांच्या आरोग्य विषयक इतर सेवांचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत गोठ्यातील सर्व जनावरांना डायरिया झालाय उपचारा पोटी सात हजार रुपये खर्च आला असल्याची माहिती राहुल पाटील यांनी एका माध्यमांशी बोलताना दिला आहे.
याविषयी पशुअधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले , तसेच पशुपालकांनी संपर्क साधलेला नाही उपलब्ध औषधा नुसार उपचार केले जातात. दवाखाना कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक गावात आठवड्यातून किमान एक वेळ तसेच गंभीर प्रश्न तातडीने भेट देऊन उपचार केले जातील शासकीय स्तरावर असलेल्या सेवेचा पशुपालकांनी लाभ घ्यावा असं उत्तर पशुवैद्यकीय आधिकर्यांना दिले आहे.
संदर्भ : ऍग्रोवन