खरीप २०२२ : शेतकऱ्यांनो कापूस बियाण्यांच्या भाववाढीला सामोरे जावे लागणार ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कापसाच्या वाढत्या भावाचा परिणाम आगामी खरीप हंगामापर्यंत जाणवणार आहे. आतापर्यंतच्या वाढत्या दराने खासगी कंपन्यांसह व्यापाऱ्यांनाही हैराण केले आहे. सध्या कापूस हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे.मात्र यानंतर शेतकऱ्यांना बियाणांच्या वाढत्या दराचा सामना करावा लागणार आहे. महागाईचा सामना करण्यासाठी त्यांना सज्ज राहावे लागेल. शेतकरी आधीच खते आणि डिझेलच्या महागाईशी झगडत आहेत. यंदा कापसाचा विक्रमी भाव 11 हजार रुपये प्रतिक्विंटल झाला आहे, त्यामुळे येत्या खरिपात कापसाचे क्षेत्र वाढणे स्वाभाविक आहे. कापूस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांनी त्याची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. बियाणे उत्पादन आणि संशोधन इत्यादींचा खर्च पाहता दर वाढण्याची अपेक्षा बियाणे उत्पादकांनी व्यक्त केली आहे.

कापूस बियाणे उत्पादनाचा वाढता खर्च पाहता, कृषी क्षेत्रातील व्यावसायिकांनी दर वाढवण्याची मागणी केली. दुसरीकडे कापसाच्या दरात वाढ झाल्याचा फायदा सर्वच शेतकऱ्यांना झाला नाही, तसेच सर्वच शेतकऱ्यांना विक्रमी दर मिळाला नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. बियाणे बनवणाऱ्या कंपन्यांनी भविष्यात त्याची वाढती मागणी लक्षात घेऊन दर वाढवल्याचा आरोपही शेतकरी करत आहेत . गतवर्षी चांगला भाव मिळाल्याने यंदा विक्रमी पेरणीचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कापूस बियाण्याच्या दरात किती बदल झाला?

कापूस बियाणांचे भाव वाढले आहेत. तसेच या वर्षीपासूनच नवे दर लागू केले जाणार आहेत. बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे म्हणणे आहे की, खर्च वाढला आहे. त्यामुळे गतवर्षी 767 रुपये किमतीचे बियाणांचे पाकीट आता 810 रुपयांना मिळाला .म्हणजेच शेतकऱ्यांवर डिझेल, खते, कीटकनाशके महागल्यानंतर आता बियाणांच्या महागाईला तोंड देण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला प्रतिक्विंटल 10 आणि 11 हजार रुपये भाव मिळत असताना या युगात बियाणे कंपन्याही नफा कमावण्याची संधी सोडू इच्छित नाहीत.