भारतीय शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता…! आता कॅनडा ला जाणार देशी केळी आणि बेबी कॉर्न

Banana Plantation
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. भारत सरकारने कृषी आणि किसान कल्याण विभागाच्या प्रयत्नानं देशातील शेतकऱ्यांसाठी त्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी नवीन योजना सुरू केल्या आहेत. आता केळी आणि मका उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. खरे तर शुक्रवारी भारतीय केंद्रीय कृषी कल्याण विभाग आणि कॅनडा सरकार यांच्यामध्ये एका विषयावर एकवाक्यता झाली आहे. ज्या अंतर्गत भारतीय केळी आणि बेबीकॉर्न कॅनडामध्ये निर्यात केला जाऊ शकणार आहे. दोन्ही देशांच्या मध्ये झालेल्या कराराच्या नंतर मक्याची शेती करणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी अधिक चांगली किंमत मिळेल.

केळी निर्यातीला मिळाली मंजुरी बेबीकॉर्न ला लवकरच

भारतीय केळी आणि बेबीकॉर्न कॅनडाला निर्यातीत करण्यासंदर्भात भारत आणि कॅनडा या दोन देशांमध्ये मागील काही दिवसांपासून बातचीत चालू होती. त्यानंतर सात एप्रिल रोजी केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण विभागाचे सचिव मनोज अहुजा आणि कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरून मैके यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये भारतीय केळी आणि बेबीकॉर्न कॅनडामध्ये निर्यात करण्यासाठी सहमती दर्शविण्यात आली आहे ज्याच्या अंतर्गत भारतीय केळी कॅनडामध्ये निर्यातिला तात्काळ मंजुरी दिली गेली आहे. तर बेबी कॉर्नच्या निर्यातीसाठी काही आवश्यक मंजुरी एप्रिल महिन्यातच दिली जाणार आहे.

भारतीय कृषी मालाची निर्यात 50 अब्ज डॉलरच्या पलीकडे

भारतानं कृषी उत्पादनाच्या निर्यातीमध्ये 50 अब्ज डॉलरहुन अधिक मजल मारली आहे. जे आतापर्यंतची सर्वाधिक आकडेवारी आहे. भारतीय कृषी उत्पादनाच्या निर्यातीमध्ये गहू आणि तांदळाची निर्यात सर्वाधिक आहे मात्र त्याबरोबरच भारतीय फळे आणि भाज्या यांचाही समावेश आहे. रशिया आणि यूक्रेन यांच्यामध्ये चाललेल्या युद्धाच्या परिणामांमुळे भारतातून सर्वाधिक मोठ्या प्रमाणात गहू निर्यात केला जात आहे. भारत इतर देशांची गव्हाची गरज पूर्ण करत आहे. त्यामुळे भारतीय गव्हाला आता नवीन ग्राहकही उपलब्ध झाले आहेत.