Weather Update : राज्यात हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस; कशी असेल इथून पुढची स्थिती ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसाने (Weather Update) हजेरी लावली आहे. राज्यात असेच वातावरण आणखी काही दिवस राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण पावसानुसार राज्यात ३८ टक्के अतिरिक्त पाऊस झाला आहे.बहुतांश जिल्ह्यांमध्ये जादा ते मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांसह राज्यातील सर्वांसाठी हे चांगले आहे. येत्या काही दिवसांत कमी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकर्‍यांना त्यांची सर्व शेतीची कामे करण्यास मदतही होईल.

राज्यातील इतर भागात हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस होत असला तरी विदर्भात मात्र जोरदार पाऊस (Weather Update) झाला आहे. एकट्या मुंबईचा विचार करिता मुंबईत आतापर्यंत यावर्षी 1500 mm पर्यंतचा टप्पा गाठला आहे.

शेतकरी शेतीच्या कामात गुंतला

सध्या पावसाने उघडीप दिली आहे. या काळात पिकांची फवारणी आणि मशागतीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. सततच्या पावसामुळे पिकांची वाढ खुंटली होती तर पेरणी क्षेत्रात तणाचा जोरही वाढला होता. यावर पर्याय म्हणून आता किटकनाशकाची फवारणी त्याचबरोबर शेती मशागतीवर शेतकऱ्यांचा भर आहे. एकरी हजारो रुपये खर्चून शेतकऱ्यांनी (Weather Update) बियाणे जमिनीत गाढले आहे. त्याचे उत्पादनात रुपांतर करण्यासाठी आता शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. त्यामुळे पावसाची उघडीप असीच काही दिवस राहिली तर खरिपातील पिके जोमाने वढतील असा विश्वास शेतकऱ्यांना आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!