आश्चर्यकारक! गाईला झाले एकाच वेळी तीन वासरे (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | एकाच वेळेस गाईला तीन वासरे होण्याची आश्चर्य जनक घटना सांगलीच्या वाळवा तालुक्यातील येलूर येथे घडली आहे. गाई किंवा म्हैस यांना एकच पिल्ल होत असते हे सर्वाना ज्ञात असताना गाईला तीन वासरे होणे म्हणजे एक चमत्कारच म्हणावे लागेल. मात्र, असा चमत्कार येलूर येथील शेतकरी चेतन पाटील यांच्या जनावरांच्या गोठ्यात पाहायला मिळाला आहे.

चेतन धनाजी पाटील व संग्राम धनाजी पाटील हे दोन भाऊ यांच्याकडे 25 गाई 5 म्हैशी 1 वळू असा 31 जनावराचा येलूर येथे मुक्त गोठा आहे. त्यापकी गोठ्यातील होस्टन जातीच्या गाईला शनिवारी सकाळी तीन वासरे झाल्याची खबर गावात पसरताच वासरे पाहण्यासाठी एकच गर्दी झाली. यामध्ये दोन पाडी व एक पाडा आहे. हे तिन्ही वासरे सदृढ आहेत. तर सध्या हे वासरे पाहण्यासाठी गावातून व परिसरातून एकच गर्दी होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!