Mango Rate : फळांचा राजा आंब्याला लागली उतरती कळा; बाजारात किती रुपयांना मिळतोय पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Mango Rate) : महाराष्ट्रातील कोकण भाग हा आंब्यासाठी अधिक प्रसिद्ध होता. कोकण भागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या ठिकाणी आंब्याची मोठी मागणी आहे. मुंबईचे नोकरदार वर्ग खासकरून या आंब्याचा स्वाद घेण्यासाठी कोकणात जातात. परंतु आता हेच आंबे गेले कुठे? यावर प्रश्नचिन्ह येतो. याआधी अनेकदा लोकं आंब्याच्या पेट्या घेऊन प्रवास करताना दिसत होते.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर कसे मिळवायचे?

शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतमालाचे रोजचे भाव आता तुम्हाला घरबसल्या मोबाईलवर मिळवणे शक्य झाले आहे. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे अँप डाउनलोड करून घ्यायचे आहे. हे अँप शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचं ठरत असून यावर शेतीशी संबंधित सर्व समस्यांचे उपाय आहेत. सातबारा उतारा काढणे, जमीन मोजणे, हवामान अंदाज, सरकारी योजना अशा अनेक सेवांचा लाभ घेण्यासाठी आजच Hello Krushi डाउनलोड करून घ्या.

उन्हाळा म्हटलं कि आंब्याची मागणी अधिक पाहायला मिळत होती. पण या काही वर्षात आंब्याचं पिक कुठे तरी मागे पडलं आहे. याआधी आंब्याची झाडे आपल्या वाड वडिलांनी लावली होती. त्या झाडांची लागवड देखील चांगल्या पद्धतीची पाहायला मिळायची. परंतु आता ग्रामीण भागात हीच झाडे सुकलेली पाहायला मिळतात. याचा परिणाम आंब्यावर पाहायला मिळतो. यामुळे आंब्याचे पिक हे संकरीत किंवा कृत्रिम पद्धतीने घ्यायला सुरुवात झाली आहे. यंदा आंब्याला बाजारभाव अपेक्षेपेक्षा खास नाही. रोज त्याच्या दरात चढ – उतार पहायला मिळत असून आंब्याला हवी अशी प्रगती दिसत नाही. जर आंब्याचा दर आणि आवक पहायची असेल तर आजच Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा. यावर सर्व पिकांच्या बाजारभावाची माहिती मिळू शकते. Mango Rate

आंब्याच्या जाती होतायत दुर्मिळ

हापूस, कलमी, राजापुरी, शेंद्र्या, शेप्या, गोटी, दश्या या नावाच्या जातींनी ओळखले जाणारे आंबे आता कालानुस्वरुपात लोप पावत चालले आहेत. फळांचा राजा आंबा, झाडे आणि आमराया दुर्मिळ होताना दिसत आहेत.

शेतमाल : आंबा (Mango Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/04/2023
पुणे-मोशीलोकलक्विंटल148000100009000
03/04/2023
औरंगाबादक्विंटल23600085007250
नाशिकहापूसक्विंटल140250003500028000
सांगली -फळे भाजीपालाहापूसक्विंटल3555000120008500
मुंबई – फ्रुट मार्केटहापूसक्विंटल782100002500017500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल240400050004500
पुणे-मोशीलोकलक्विंटल58000100009000
नागपूरलोकलक्विंटल744250041503738
मुंबई – फ्रुट मार्केटलोकलक्विंटल2710600070006500
कामठीलोकलक्विंटल2300040003500
सोलापूरनं. १नग152240036002800
सोलापूरनं. १क्विंटल96450060005000