हॅलो कृषी ऑनलाईन (Mango Rate) : राज्यात आणि देशातील इतर काही राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने धिंगाणा घातला आहे. यामुळे रब्बी पीक आणि भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्तर प्रदेश, ओडिशा तसेच इतर राज्यात आंबा पिकाची नासाडी झाली. या बदलत्या वातावरणामुळे इतर पिकांचे नुकसान झालं आहे. यामुळे आता आंबा महाग होण्याची शक्यता आहे.

रोजचे बाजारभाव चेक करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी अस्वस्थ असून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये फक्त आंब्यांचे नाही तर त्यासोबत रब्बी पिकांचे देखील नुकसान झालं. पावसामुळं आंबा, द्राक्ष, केळी, संत्रा या फळबागांसह गहू, हरभरा, मका, मोहरी, ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
इथे मिळतोय थेट शेतकऱ्यांकडून आंबा
तुम्हाला कमी दरात चांगल्या क्वालिटीचा आंबा विकत घ्यायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल अँप तुमच्यासाठी सर्वात बेस्ट पर्याय आहे. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi या मोबाईल अँप वर शेतकरी ते ग्राहक थेट विक्री सेवा उपलब्ध असून ग्राहक आंबा, इंद्रायणी तांदूळ, गहू, ज्वारी, तूप अशा गोष्टी आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांकडून खरेदी करू शकतात. आजच याचा लाभ घेण्यासाठी तुमच्या मोबाईलवर Hello Krushi अँप इन्स्टॉल करा.
उत्तरप्रदेशातील चित्रकूटमधील आंबा बागांवर पाऊस आणि गारपिटीचा मोठा परिणाम झाला. या पावसामुळे ओलावा तयार झाला. यामुळे पिकांवर रोगराई तयार झाली. ओडिशातही आंब्यांच्या बागांवर या पावसाचा विपरीत परिणाम पहायला मिळत आहे. तसेच अचानक अधूनमधून वाढणारे तापमान या बदलत्या वातावरणामुळे आंब्याच्या उत्पादनावर परिणाम होताना दिसतो. (Mango Rate)
महाराष्ट्रातही अवकाळी पावसाचा आंबा फळ पिकांना फटका
महाराष्ट्रातही अवकाळी पावसाचा फटका हा आंबा फळ पिकांना होताना दिसतोय. गेल्या अनेक वर्षांपासून या बदलत्या वातावरणाचा परिणाम पिकांवर होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यामुळे तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे यंदा राज्यात आंबे उत्पादनात फारशी वाढ पहायला मिळाली नाही.
तुमच्या शहरात आंब्याचा दर काय?
आंब्याचे दर व्हरायटी नुसार आणि शहरांनुसार सतत बदलत असतात. सध्या अक्षयतृतीयानंतर आंब्याचे दर काही प्रमाणात खाली येण्याची शक्यता सांगण्यात येते आहे. मात्र असे असले तरी आंब्यांची बाजारात कमी आवक असल्याने दर स्थिर राहण्याचीहि शक्यता आहे. पुणे मुंबई या शहरांत देवगड हापूस आंबा साधारण ९०० रुपये डझन या दराने विक्री होत आहे. तसेच इतर लोकल आंबे ४०० ते ५०० रुपये डझन भावाने मिळत आहेत.
शेतमाल : आंबा (Mango Rate)
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
23/04/2023 | ||||||
भुसावळ | — | क्विंटल | 18 | 5000 | 5000 | 5000 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 139 | 5000 | 15000 | 10000 |
राहता | लोकल | क्विंटल | 4 | 4000 | 5000 | 4500 |