Cotton Rate : कपाशीचे आजचे बाजारभाव वाढले कि कमी झाले?

Cotton Rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (cotton Rate) : कापूस विक्रीत सध्या उन्हाळी हंगाम असल्याने अधिकाधिक वाढ पहायला मिळत आहे. मात्र शेतकऱ्याला जो दर अपेक्षित आहे त्या दराप्रमाणे भाव मिळत नाही. काही दिवसांपूर्वी कापसाचे दर हे ७ हजार ५०० ते ८ हजार रुपये पहायला मिळत होते. या दरात ‘कभी खुशी कभी गम’ म्हणजेच चढ – उतार पहायला मिळत आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आज (ता.६) या दिवशी कापसाच्या दराबाबत आणि आवकाबाबत विचार केल्यास सेलू बाजारसमितीत ८ हजार ३५ रुपये एवढा कापसाचा दर आहे. तसेच सेलू बाजरसमितीत सर्वाधिक आवक ही ३ हजार ३०० प्रतिक्विंटल पहायला मिळत असून राज्यातील कापसाचा सर्वात कमी दर हा ७ हजार १०० रुपये आहे. तसेच यंदाच्या कापूस हंगामात राज्यात एकूण ३८ हजार कापूस गाठींची आवक केली गेली आहे. तसेच ३२ हजार कापसाच्या गाठींची आतापर्यंत विक्री झाली आहे.

दररोजचे बाजारभाव दर जाणून घेण्यासाठी हे नक्की करा

राज्यात शेतकऱ्याने पिकवलेल्या पिकाच्या दरात दररोज बदल होताना दिसत आहे. यामुळे दररोजच्या बाजारभाव दरात कधी चढ तर कधी उतार जाणवतो. हेच बदलते दर जाणून घेण्यासाठी Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करावं लागेल. यासाठी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन ॲपचे नाव सर्च करून ॲप इंस्टॉल करावा लागेल. नंतर या ॲपद्वारे आपल्याला हव्या त्या पिकांचे बाजारभाव एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकतात. तसेच शेतजमीन मोजणी, सातबारा उतारा, पशुपालन, सरकारी योजना यांची माहिती निःशुल्क या ॲपद्वारे मिळवता येऊ शकते.

शेतमाल : कापूस (Cotton Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/05/2023
सावनेरक्विंटल1800770077007700
किनवटक्विंटल36710077007500
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1686770079007800
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल620750078507750
उमरेडलोकलक्विंटल299740078507700
देउळगाव राजालोकलक्विंटल600770079007800
सिंदी(सेलू)मध्यम स्टेपलक्विंटल3300785080357960