द्राक्ष लागवडीसाठी सरकार शेतकर्‍यांना देतेय आर्थिक सहकार्य; जाणुन घ्या अनुदान कसे मिळवायचे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासहित द्राक्ष लागवडीसाठी आर्थिक सहकार्य केले जाते. Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan मापदंडानुसार २ लाख १६ हजार ६५० इतका खर्च प्रति हेक्टर येतो. यामध्ये ३ x ३ मीटर लागवड अंतरासाठी एकूण खर्चाच्या प्रति हेक्टरी ४०% किंवा जास्तीत जास्त रु ८४ हजार ६६० रु इतके अर्थसहाय्य सरकार करते. जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्रापर्यंत मर्यादित अर्थसहाय्य केले जाते. वैयक्तिक शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतात. Grapes Plantation (With Drip)

लाभ घेण्यासाठीचे निकष

१. वेगवेगळ्या लागवड अंतरासाठी वेगळी रक्कम

२. लागवड साहित्य मानांकित रोपवाटिकेतून घेणे बंधनकारक

३. अधिक उत्पन्न देणारे वाण Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan

४. ठरविलेली निविष्ठा वापरणे एकात्मिक खत, कीड, आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन ई.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
१. ७/१२
२. ८-अ उतारा
३. प्रकल्प अहवाल
४. ओलिताची शाश्वत सोय
५. योग्यरीत्या भरलेला अर्ज ई.

Ekatmik Falotpadan Vikas Abhiyan योजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ई. ना संपर्क साधता येतो.