Success Story : सख्ख्या भावांनी नोकरी सोडून केला दुधाचा व्यवसाय! महिन्याला होतेय लाखोंची कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Success Story । देशातील नामंकित कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरच्या बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर तरुणवर्ग व्यवसायाकडे वळू लागला आहे. परंतु कोल्हापुरात काहीस वेगळं पाहायला मिळाले आहे. दोन सख्ख्या भावांनी गलेगठ्ठ पगाराची नोकरी सोडून दुग्धव्यवसाय केला आणि त्यातून त्यांनी लाखोंची उलाढाल केली आहे. त्यामुळे समाजातून त्यांचे कौतुक केले जात आहे. (Marathi News)

कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील सतिश नरके आणि संदीप नरके या दोन भावंडांनी नोकरी सोडून पशुपालन करण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांच्याकडे १९ गायी आहेत. त्यातून ते प्रत्येक महिन्याला एक ते दीड लाख रुपयांचा नफा मिळवत आहे. नरके बंधू मागील ८ ते १० वर्षांपासून हा व्यवसाय करत आहेत. दरम्यान, सतिश नरके आणि संदीप नरके हे दोघेजण एका कंपनीत नोकरी करत होते. (Agriculture News)

परंतु काम जास्त आणि पगार कमी मिळत असल्याने त्या दोघांनीही नोकरी सोडून देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या वडिलांनी पाठिंबा दिला. सुरुवातीला त्यांच्याकडे फक्त एकच होती. परंतु संपूर्ण कुटुंबच या व्यवसायात उतरल्याने त्यांनी हळूहळू गायी घेतल्या. त्यांच्याकडे १ देशी गाय, एच एफ, त्रिवेणी, पंजाबी तसेच जर्मनी अशा जातीच्या १९ गायी आहेत.

ते दररोज २०० लिटर दुधाची वारणा दूध संस्थेत विक्री करतात. गाईंच्या दुधाला ४० ते ४१ रुपये दर मिळतो. यातून दर दहा दिवसाला ६० ते ७० हजार रुपये तर प्रत्येक महिन्याच्या शेवटी एक ते दीड लाख रुपये नफा कमावतात. तसेच ते शेणखतातून दोन ते तीन लाखाचे उत्पन्न मिळवतात. नरके यांनी मुक्त गोठा पद्धत अवलंबली असून ठीक ठिकाणी गायींसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. त्यांनी फक्त पशुपालन नाही तर शेळीपालनाचा व्यवसायही सुरु केला आहे. सध्या त्यांच्याकडे २३ शेळ्या आहेत.