Ginger Rate : सध्या भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आता भाजीपाला खरेदी करताना देशातील सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत तुम्ही सर्वत्र टोमॅटोच्या बाजारभावाबद्दल ऐकलं असेल कारण मागच्या काही दिवसापासून टोमॅटोचे भाव तेजीत असल्याने सगळीकडे टोमॅटोचीच चर्चा होत आहे. पण आता काही भाज्या अशा आहेत ज्या त्यापेक्षा महाग झाल्या आहेत. यामध्ये आपण चहात वापरणारे आले देखील महागले आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा
आल्याचे भाव भिडले गगनाला
आले ही एक अशी गोष्ट आहे ज्याचा स्वयंपाकघरातमध्ये दररोज उपयोग केला जातो. आले जास्तीत जास्त चहामध्ये वापरले जाते. त्याचबरोबर याचा उपयोग भाजी आणि चटण्या बनवण्यासाठी देखील केला जातो एवढंच नाहीतर अनेक प्रकारचे डेकोक्शन बनवण्यासाठी देखील आल्याचा वापर केला जातो. मात्र सध्या आल्याच्या किमती देखील वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. (Ginger Rate)
तुम्हाला आल्याचा भाव चेक करायचा असेल तर आत्ताच प्लेस्टोअरवर जा आणि Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. हे अँप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला यामध्ये दररोजचे बाजारभाव पाहता येतील त्याचबरोबर अन्य शेतीविषयक माहिती देखील तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल तेही अगदी मोफत. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअरवर जाऊन हे अँप डाउनलोड करा.
पावसामुळे अनेक भाजीपाला खराब झाल्याने बाजारामध्ये कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. बाकी भाज्यांबरोबर बाजारात आल्याचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या बाजारामध्ये चारशे रुपये किलोने आले विकले जात आहे. आले खरेदी करायचे असल्यास 400 रुपये खर्च करावे लागतील. तर दुसरीकडे, चांगल्या प्रतीचे आले खरेदी करायचे असेल, तर सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले आले सुमारे ६०० रुपये किलोने विकले जात आहे.
शेतमाल : आले (Ginger Rate)
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
18/07/2023 | ||||||
जळगाव | — | क्विंटल | 9 | 4000 | 9500 | 6700 |
राहता | — | क्विंटल | 4 | 13000 | 16000 | 14500 |
पुणे | लोकल | क्विंटल | 185 | 3000 | 15100 | 9050 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 18 | 8000 | 9000 | 8500 |
मुंबई | लोकल | क्विंटल | 874 | 10000 | 16000 | 13000 |
कराड | लोकल | क्विंटल | 9 | 8000 | 14000 | 14000 |
कामठी | लोकल | क्विंटल | 1 | 10000 | 11000 | 10500 |