Cotton Production : देशातील कापूस उत्पादन 7.5 टक्के घटण्याची शक्यता

Cotton Production
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा देशात सरासरीच्या केवळ 94 टक्के पाऊस झाल्याने कापूस लागवडीखालील क्षेत्रात मागील हंगामाच्या तुलनेत 5 टक्क्यांनी घट झाली. परिणामी आता देशातील (Cotton Production) कापूस उत्पादनात 7.5 टक्के घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाचे दर 0.48 टक्क्यांनी वाढून ते 58 हजार 620 रुपये प्रति कँडी (१ कँडी कापूस म्हणजे 356 किलो रुई) पर्यंत पोहचले आहेत.

कापूस लागवड क्षेत्रात घट का झाली? Cotton Production

2023-24 या वर्षात झालेला कमी पाऊस आणि अल निनोच्या प्रभावामुळे यंदा देशातील कापूस लागवड क्षेत्रात घट झाली. आता कापूस उत्पादकतेवरही (Cotton Production) त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. भारतीय कापूस महामंडळाच्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात देशात कापसाची आयात वाढणार असून, यंदा 2.2 मिलियन गाठी (1 गाठ म्हणजे १७० किलो) आयात कराव्या लागू शकतात. मागील वर्षी 1.25 मिलियन गाठींची आयात करण्यात आली होती.

दरम्यान, अमेरिकी कृषी खात्याच्या (यूएसडीए) रिपोर्टनुसार, तेथील टेक्सास या प्रमुख कापूस उत्पादक राज्यात उत्पादनात मोठी घट होणार आहे. परिणामी, अमेरिकेतही कापूस उत्पादनात घट होण्याचे संकेत आहे. केंद्रीय वस्‍त्रोद्योग मंत्रालयाच्‍या आकडेवारीनुसार 2022-23 या वर्षांत 341.91 लाख कापूस गाठींचे उत्‍पादन झाल्‍याचा अंदाज आहे. तर चालू 2023-24 च्या कापूस हंगामात देशात सुमारे 330 लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे.