आपल्याला करोडपती बनवू शकते चंदनाची शेती! मिश्रशेतीचाही चांगला पर्याय; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Sandalwood
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी । चंदनाची शेती केली जाते हे ऐकायला नवीन वाटू शकते अथवा काही शेतकरी वाचक सध्या हि शेती करताही असतील. चंदन शेती देशात कमी प्रमाणात केली जाते. पण महाराष्ट्रात काही ठिकाणी चंदनाची झाडं येतात. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातही काही ठिकाणी ते दिसतात. पण त्याची शेती केली तर 1 एकरात काही कोटींची हमी आहे. चंदनाचं झाड खूप महागडं असतं. याचा वापर होम हवन, पुजेत आणि सौन्दर्य प्रसादनामध्ये करतात. देशातल्या फार कमी भागात चंदनाची शेती केली जाते. तुम्ही एक झाड जरी चंदनाचं लावलं तर कमीत कमी त्याची किंमत 5 लाख रुपये एवढी आहे. त्यामुळे यातून मोठ्या प्रमाणात कमाई होऊ शकते. यातून आपण करोडपतीही होऊ शकता. देशात सध्या चंदनाची शेती ही हरयाणात घरोंडा नावाचं गाव आहे. तिथं एक शेतकरी चंदनाची शेती करतो. त्यांनी काही एकरावर चंदनाची झाडं लावलेली आहेत आणि ते आता चांगले वाढताना दिसतायत. चंदनाचं रोपटं लावलं तर त्याचं झाड व्हायला 12 वर्षे लागतात. एक जर रोप लावलं तर पाच ते सहा लाख रुपयांची कमाई निश्चित आहे.

घरोंड्याच्या शेतकऱ्यानं तर एका एकरात 600 चंदनाची रोपटी लावलीत. त्याला आता तीन वर्ष झालीत. म्हणजे आणखी 9 वर्षानं त्यांना 30 कोटी रुपयांची कमाई होऊ शकेल अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रातही विदर्भातल्या काही जिल्ह्यात चंदनाची शेती पाहायला मिळते. चंदनाचं रोपटं खूप महाग मिळतं. म्हणजे त्याची जशी कमाई आहे तशीच त्याच्या रोपट्याची किंमत आहे. एका रोपासाठी 500 ते 600 रुपये मोजावे लागतात. महाराष्ट्रात सध्या याचं बियाणं मिळतं. चंदनाची लागवड थोडी अवघड आहे. शंभर बिया पेरल्या तर त्यातल्या दहा ते पंधरा टक्के किंवा जास्तीत जास्त 20 टक्के येतात. एखाद्या किलो बियाण्यांपासून दोनशे ते अडीचशे रोपं तयार होतात. जून महिना लागवडीसाठी योग्य आहे. पेरलेलं उगवायला जवळपास दोन महिने लागतात. दोन वर्षे चंदनाच्या रोपट्याची वाढ पिशवीतच होते. पण दोन वर्षात पिशवी काही वेळा बदलली जाते. पाच ते सहा वर्षात झाडाची उंची बारा ते पंधरा फूट एवढी अपेक्षीत आहे. ज्या खड्यात चंदन लावलेलं आहे तो माती आणि शेणखतानं भरलेला असतो. विशेष म्हणजे चंदन सर्व प्रकारच्या मातीत उगवतं. तग धरतं. चंदनाला फार जास्त पाणी चालत नाही.

फक्त सरकारच चंदनाची निर्यात करु शकते. चंदनाचं झाड तयार झालं की वनविभागाला तशी माहिती द्यावी लागते. त्यानंतरच निर्यातीचं काम केलं जातं. चंदन जगातलं सर्वात महागडं झाड आहे. सध्या प्रती किलो 27 हजार रुपये त्याची किंमत आहे. एका झाडापासून 15 ते 20 किलो चंदनाचं लाकुड मिळतं, ज्याची किंमत 5 ते 6 लाख रुपये एवढी आहे. सुगंधी तेलापासून ते आयुर्वेदिक औषधं आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये चंदनाचा वापर केला जातो. म्हणूनच त्याला जास्त किंमत आहे. चंदनाच्या शेतीत इतर पिकही घेता येतात. चंदनाच्या दोन झाडात 20 फुटाचं अंतर ठेवावं आणि मग त्यात इतर पिकं घेता येतात. फक्त ऊस किंवा तांदुळ त्यात लावता येत नाही. कारण ह्या दोन्ही पिकांना पाणी भरपूर लागतं आणि चंदनाच्या झाडाला पाण्याचाच धोका जास्त आहे.