अरबी समुद्रात चक्री वादळाचे संकेत, हवामान खात्याकडून सतर्कतेचा आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अरबी समुद्राच्या आग्नेय भागात तीव्र कमी दाबाचे सक्रिय क्षेत्र निर्माण होत आहे. उद्या या क्षेत्राची तीव्रता अधिक वाढणार असून त्याचे चक्रीवादळा मध्ये रूपांतर होण्याचे संकेत आहेत. त्यानंतर ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे त्याचा काहीसा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार आहे येत्या काही दिवसात राज्यात पूर्व मोसमी च्या सरीचा प्रभाव वाढणार असल्याचा हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

अरबी समुद्रात चक्रीवादळ ची स्थिती तयार झाल्यानंतर राज्याला अधिक फटका बसला नसला तरी केरळ तमिळनाडू कर्नाटक या राज्यात 15 मेच्या दरम्यान अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. तर सुरुवातीला या चक्रीवादळामुळे वाऱ्याचा ताशी वेग चाळीस ते पन्नास किलोमीटर राहून तो हळूहळू वाढत जाईल साधारणपणे 80 किलोमीटर पर्यंत वेगाने वारे वाहतील. त्यामुळे मासेमारी साठी गेलेल्या मत्स्य व्यवसायिकांनी आजपासून पुढील दोन ते तीन दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे तसाच अरबी समुद्र आणि लक्षदीप, मालदीव परिसर व हिंद महासागरात ही वेगानं वारे वाहणार असून मान्सून प्रवाह सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण बनण्याची शक्यता आहे.

दरम्यान बुधवारी सकाळी मागील 24 तासात विदर्भात चंद्रपूर येथे सर्वाधिक 42. ८ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवला गेला आहे. राज्यात सिंधुदुर्ग, संपूर्ण विदर्भ, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या भागात पूर्व मोसमी पावसाची हजेरी लागणार आहे