Vegetable Farming : पाणी नाही हीच संधी माना, करा ‘या’ पाच भाजीपाल्याची लागवड; व्हाल मालामाल!

Vegetable Farming In Maharashtra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : फेब्रुवारी महिना संपत आला असून, मार्च महिन्याच्या सुरुवातीसह उन्हाळ्याची (Vegetable Farming) चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, आता तुमच्याकडे बोअरवेल किंवा शेततळ्याचे थोड्या फार प्रमाणात पाणी असेल. आणि ठिबकद्वारे पाण्याचे सुयोग्य पद्धतीने नियोजन करून, भाजीपाला पिकांची लागवड करायची तयारी असेल. तर आज आम्ही तुम्हाला अशा पाच भाजीपाला पिकांबद्दल (Vegetable Farming) सांगणार आहोत. ज्यांची लागवड करून, तुम्ही कमी कालावधीमध्ये यावर्षी मालामाल होऊ शकतात.

अनेक भागांमध्ये पाण्याची कमतरता (Vegetable Farming In Maharashtra)

राज्यात नोव्हेंबर-डिसेंबर 2023 या काळात लागवड केलेल्या रब्बी पिकांचे वावर सध्या मोकळे होत आहेत. यावर्षी एल-निनोच्या प्रभावामुळे पावसाळा कमी झाला असल्याने, अनेक भागांमध्ये पाणी नाही. हीच संधी मानून यंदा उन्हाळ्यात भाजीपाला पिकांचे (Vegetable Farming) दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तुमच्याकडे सध्या काही प्रमाणात पाणी उपलब्ध असेल तर तुम्ही कोबी, फ्लॉवर, मेथी, कोथिंबीर, गवार या पाच पिकांच्या लागवडीतून लाखांची कमाई करून मालामाल होऊ शकतात. या सर्व पिकांसाठी तुम्हाला ठिबक, मल्चिंग पेपर यासांसारख्या साधनांचा वापर करून, जमिनीची चांगली मशागत करूनच लागवड करायची आहे. चला तर मग या पाच उन्हाळी पिकांबाबत जाणून घेऊया…

1. उन्हाळी मेथी लागवड

राज्यात सर्वाधिक विकली जाणारी पालेभाजी म्हणून मेथी प्रसिद्ध आहे. तिला बाजारात नेहमीच मागणी असते. मेथीच्या भाजीची सर्वात मोठी विशेषतः म्हणजे ती केवळ 35 ते 40 दिवसात काढणीला येते. त्यामुळे आता तुमचे रब्बी पिकाचे वावर मोकळे झाले असेल. तर तुमच्यासाठी यंदा मेथीच्या भाजीतून भरघोस कमाई करण्याची ही नामी संधी आहे. मेथीची लागवड करताना तुम्ही कसुरी सिलेक्शन (पुसा सिलेक्शन), पुसा अर्लि बंचिग, आणि मेथी नं. 47 या प्रजातींची निवड करू शकतात. साधारणपणे 1 गुंठा वावरात 100 ते 150 मेथीच्या जुड्या हमखास मिळतात.

२. उन्हाळी कोथिंबीर लागवड

उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरीचे तुलनेने उत्पादन कमी असते. तर लग्नसराईचा सीजन असल्याने कोथिंबिरीला मोठी मागणी असते. ज्यामुळे तिला नेहमीच अधिक दर मिळतो. कोथिंबिरीचा वापर हा प्रामुख्याने घराघरात आणि हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये देखील होतो. त्यामुळे तुम्ही यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याचे सुयोग्य नियोजन करून बेडवर कोथिंबिरीची लागवड केल्यास नक्कीच मालामाल होऊ शकतात. कोथिंबीर साधारणपणे 40 ते 50 दिवसांत काढणीला येते. मेथी व कोथिंबीरची बेडवर लागवड करताना आधी एकदा पाणी सोडून बेड ओले करून घ्यावे. आणि मग कोथिंबीरच्या एखाद्या प्रजातीच्या बियाण्याची निवड करून लागवड करावी.

३. उन्हाळी कोबी लागवड

शेतकरी मित्रांनो कोबी लागवड करताना (Vegetable Farming) आपला कोबी केवळ एक किलो ते पाऊन किलो इतक्या साईजचा होईल. अशाच पद्धतीने कोबी उत्पादन घ्यायचे आहे. कारण लहान आकाराचा कोबी हा चवीला सर्वोत्तम मानला जातो. कोबी लवकर काढणीला येऊन तुमची पाणी बचतही होऊ शकते. अशा लहान आकाराच्या कोबीला बाजारात खूप मागणी असते. आणि दरही अधिक मिळतो. कोबी हा प्रामुख्याने 60 ते 70 दिवसांत काढणीला येतो. कोबीचे हेक्‍टरी 200 ते 250 क्विंटल उत्पादन मिळते. यासाठी तुम्ही प्रामुख्याने जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन विविध प्रजातीपैकी एखाद्या लवकर काढणीला येणाऱ्या उत्तम प्रजातीची निवड करू शकतात.

४. उन्हाळी फ्लॉवर लागवड

कोबीप्रमाणेच फ्लॉवर देखील प्रामुख्याने 70 दिवसांत काढणीला येते. सुहासिनी (सिजेंटा), किमया (सिजेंटा), रेगाल व्हाइट (सिजेंटा) या प्रजातींची तुम्ही निवड करू शकतात. तुम्ही जर नर्सरीमधून रोपे उपलब्ध करणार असाल तर शेतात रोपे लावण्यापूर्वी एक ग्रॅम स्ट्रेप्टोसायक्लिन 8 लिटर पाण्यात विरघळवून 30 मिनिटे बुडवून प्रक्रिया करावी. मगच लागवड करावी. साधारपणे फ्लॉवरच्या लवकर येणाऱ्या वाणांची लागवड करताना 40 सेमी बाय 30 सें.मी. अंतर ठेवले पाहिजे. तर मध्यम आणि उशीरा येणाऱ्या वाणांमध्ये 45 बाय 45 सेंमी अंतर ठेवले पाहिजे. फ्लॉवरचे साधारणपणे 100 ते 200 क्विंटल हेक्‍टरी उत्‍पादन मिळू शकते.

५. उन्हाळी गवार लागवड

उन्हाळयात लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमांमुळे उन्हाळी हंगामात गवारीला (Vegetable Farming) मोठी मागणी असते. पाण्याची उपलब्धता असेल तर अगोदर पाणी सोडून बेड ओला करून घ्यावा. टोकण पद्धतीने गवार लागवड करताना प्रामुख्याने दोन ओळीतील अंतर 45 ते 60 सें. मी. ठेवावे आणि झाडातील अंतर 20 ते 30 सें. मी. ठेवावे. पुसा सदाबहार, पुसा नवबहार, सुरती गवार, देशी (गावरान ) गवार, नंदिनी (एनसीबी 12) यापैकी कोणत्याही एका प्रजातीची निवड तुम्ही करू शकतात. साधारपणे गवारीचे एका बिघ्यात 10 ते 12 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.