हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात मशरूम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या (Success Story) दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक जण आपल्या उपलब्ध जागेत आणि उपलब्ध वातावरणात मशरूम लागवड करत मोठ्या प्रमाणात नफा मिळवत आहेत. इतकेच नाही तर अलीकडे अतिदुर्गम जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने झोपडीत यशस्वी मशरूम शेती केल्याचे समोर आले होते. अशातच आता खासगी क्षेत्रातील चांगली पगाराची नोकरी सोडून मशरूम शेतीची कास धरत, एक शेतकरी लाखोंची कमाई करत असल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर या शेतकऱ्याने आपल्याकडे एकूण 20 जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आज आपण या शेतकऱ्याची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.
नोकरीला केला रामराम (Success Story Of Mashroom Farming)
बलविंद्र सिंह असे या प्रगतिशील शेतकऱ्याचे नाव असून, ते हरियाणातील कर्नाल जिल्ह्याचे रहिवासी आहे. बलविंद्र हे एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. मात्र खासगी कंपनीत मन रमत नसल्याने, त्यांनी नोकरीला रामराम केला. शेतीची आवड असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. मात्र, इतर शेतकऱ्यांप्रमाणे पारंपरिक शेती न करता त्यांनी मशरूम लागवडीबाबत (Success Story) माहिती मिळवली. त्यानुसार माहिती मिळवत, सध्या ते जवळपास दीड एकरात मशरूम शेतीसाठी आवश्यक वातावरण उभे करून, लाखो रुपयांची कमाई करत आहेत. त्यांनी आपल्या दीड एकराच्या मशरूम शेतीतुन एकूण 20 जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
हळूहळू रोवले मशरूम शेतीत पाय
बलविंद्र सिंह सांगतात, मशरूम शेतीसाठी त्यांनी सर्वप्रथम कच्चे शेड उभारले. त्यातून व्यवसायाला सुरुवात केली. ज्यामुळे हंगामी मशरूम लागवडीतून कमी खर्चात अधिक नफा मिळवला. आणि व्यवसायात आधीच भांडवल गुंतवण्याचा धोका कमी झाला. त्यानंतर कालांतराने हळूहळू आपण मशरूम शेतीत पाय रोवत सध्या दीड एकरात पक्के अत्याधुनिक शेड उभारले आहे. शेड उभारण्यासाठी आपल्याला सरकारकडून सरकारी योजनेच्या माध्यमातून 40 टक्के अनुदान मिळाले आहे. पारंपरिक शेतीत जास्त उत्पन्न मिळत नाही. मात्र, मशरूम शेतीत योग्य पद्धतीने काम केल्यास अनेक पटीने लाभ मिळत असल्याचे शेतकरी बलविंद्र सिंह सांगतात.
किती खर्च, किती उत्पन्न?
बलविंद्र सिंह सांगतात, मशरूमची एक बॅच घेण्यासाठी साधारणपणे दीड लाख रुपये खर्च येतो. तर एका बॅचमधून जवळपास तीन ते साडे तीन लाख रुपये इतके उत्पन्न (Success Story) मिळते. मशरूम बाजारात किती दर मिळतो, यावर आपला नफा अवलंबुन असतो. सुरुवातीला मशरूम विक्रीमध्ये अडचणी येतात. मात्र, हळूहळू बाजारात पाय रोवले की आपल्या मशरूमची गुणवत्ताच मार्केट खेचते. असेही ते सांगतात.
शेतकऱ्यांना वेगळा मार्ग निवडण्याचा सल्ला
मागील सहा वर्षांपासून आपण मशरूम शेतीत कार्यरत असून, आपण आसपासच्या सर्व राज्यांमध्ये आपला उत्पादित मशरूम पाठवतो. एकदा उत्पादन सुरु होईपर्यंत आणि बाजारपेठ काबीज करेपर्यंत माहिती मिळवणे आवश्यक असते. त्यानंतर सर्व गोष्टी आपोआप जुळून येतात. असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांची लागवड करण्याऐवजी आधुनिक पद्धतीने नावीन्यपूर्ण पिके किंवा वेगळा मार्ग निवडावा, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना शेवटी केले आहे.